शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

खामगावात सीएएच्या समर्थनार्थ मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 17:37 IST

राष्ट्रीय एकता मंचच्यावतीने अत्यंत शिस्तबध्द व शांततेत हा मोर्चा काढण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव  :  भारतीय नागरीकता संशोधन कायद्याच्या समर्थनार्थ  बुधवारी खामगावात भव्य मोर्चा काढण्यात आला. शिवाजी नगरातील  छत्रपती शिवाजी महाराज स्टेडीयम येथून सकाळी ११ वाजता या मोर्चाला सुरूवात झाली.  राष्ट्रीय एकता मंचच्यावतीने अत्यंत शिस्तबध्द व शांततेत हा मोर्चा काढण्यात आला.              पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारने नुकतेच नागरिक सुधारणा विधेयक संसंदेत पारित केले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या स्वाक्षरीनंतर नागरिक्त सुधारणा कायदा देशात लागू झाला आहे. या कायद्याच्या समर्थनार्थ राष्ट्रीय एकता मंच खामगावच्या वतीने एकता मोचार्चे आयोजन करण्यात आले  सकाळी ११ वाजता शिवाजी नगर भागातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याला जिल्हा संघचालक महादेवराव भोजने, मोर्चा समितीचे अध्यक्ष सागर फुंडकर, संयोजक अ‍ॅड.अमोल अंधारे अभिवादन केले. त्यानंतर निर्मल टर्निंग, सरकी लाईन, महावीर चौक, फरशी, भगतसिंग चौक, टॉवर चौक मार्गे उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी मोर्चा समिती व विविध संघटनांच्या पदाधिकाºयांच्या हस्ते महामहीम राष्ट्रपती यांना उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत भारतीय नागरीकता संशोधन कायदा २०१९ व सीएए / एनआरसी च्या समर्थनार्थ व अभिनंदनपर निवेदन सादर करण्यात आले.यामध्ये भारतीय नागरिकता सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच विरोधकांनी विविध ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी केलेल्या नुकसानीची भरपाई करण्याची मागणी करण्यात आली. तसेच असंवैधानिक पध्दतीने विरोध, जाळपोळ, दगडफेक व राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान करणाºया व निष्पाप पोलीस अधिकारी, प्रशासनावर दगफेक करणाºया आंदोलकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.               या मोर्चामध्ये राष्ट्रीय एकता मंचचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि महिला, पुरुष, युवक, विविध संघटनांचे पदाधिकारी, नागरीक सहभागी झाले होते.  यावेळी पोलिस प्रशासनातर्फे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

टॅग्स :khamgaonखामगावcitizen amendment billनागरिकत्व सुधारणा विधेयक