शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

मुलीच्या जन्मानंतर अवघ्या पावणे दोन मिनीटात आधार नोंदणींचा विक्रम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 14:26 IST

मुलीच्या जन्मानंतर अवघ्या पावणे दोन मिनीटात आधार नोंदणींचा खामगावअनोखा विक्रम खामगाव येथील अग्रवाल कुटुंबियांनी केला आहे.

ठळक मुद्देआकाश अग्रवाल यांच्या पत्नी सौ. शिल्पा अग्रवाल यांना प्रसुतीसाठी१८ एप्रिल २०१८ रोजी पहाटे ५:३० वाजता भरती करण्यात आले.सकाळी ०८ वाजून ०७ मिनीटांनी मुलीचा जन्म झाला.जन्मानंतर  आकाश अग्रवाल यांनी मुलीच्या आधार कार्डसाठी नोंदणी केली. नोंदणी केल्यानंतर अग्रवाल यांच्या साची नामक अपत्याला १ मिनीट ४८ सेंकदात आधार कार्ड मिळाले आहे.

खामगाव :  मुलीच्या जन्मानंतर अवघ्या पावणे दोन मिनीटात आधार नोंदणींचा अनोखा विक्रम खामगाव येथील अग्रवाल कुटुंबियांनी केला आहे. साची अग्रवाल नामक मुलीचे आधार कार्ड काढताना, उस्मानाबाद येथील यापूर्वी सहा मिनीटांत आधार कार्ड काढण्याचा रेकॉर्ड मोडीत निघाल्याचे अधोरेखीत झाले आहे. 

खामगाव येथील आकाश अग्रवाल यांच्या पत्नी सौ. शिल्पा अग्रवाल यांना प्रसुतीसाठी जलंब रोडवरील एका हॉस्पीटलमध्ये  १८ एप्रिल २०१८ रोजी पहाटे ५:३० वाजता भरती करण्यात आले. सकाळी ०८ वाजून ०७ मिनीटांनी मुलीचा जन्म झाला. मुलीच्या जन्मानंतर  आकाश अग्रवाल यांनी मुलीच्या आधार कार्डसाठी नोंदणी केली. ही नोंदणी केल्यानंतर अग्रवाल यांच्या साची नामक अपत्याला १ मिनीट ४८ सेंकदात आधार कार्ड मिळाले आहे. यापूर्वी जन्मानंतर सहा मिनीटांमध्ये आधार कार्ड काढण्याचा विक्रम उस्मानाबाद  येथील भावना संतोष जाधव या मुलीच्या नावावर असून, उस्मानाबाद येथील संतोष जाधव  व्यक्तीने आपल्या मुलीचा जन्म झाल्यानंतर सहा मिनीटांमध्ये आधार कार्ड काढल्याचे उस्मानाबाचे तत्कालीन जिल्हाधिकारी राधाकृष्ण गेम यांनी स्पष्ट केले होते. त्यानंतर आता मुलीच्या जन्मानंतर खामगाव येथील आकाश अग्रवाल यांनी त्यांच्या साची नामक मुलीचे आधारकार्ड अवघ्या १ मिनीट ४८ सेकंदात काढून विक्रम नोंदविला आहे.  साची अग्रवाल हिला यूनिक आयडेंटिफीकेशन अथॉरिटी आॅफ इंडिया (यूआयडीएआय) कडून आॅनलाईन आधार क्रमांक मिळाला असून, तिचा आधार क्रमांक ३०७४ ५५८९ ७८५२ असा आहे.  तथापि, या  आनंददायी घटनेमुळे खामगाव येथील अग्रवाल कुटुंबियांमध्ये मुलीच्या जन्मासोबतच आधार कार्ड नोंदणीत विक्रमाचा दुहेरी आनंद असल्याचे दिसून येते.

ताबडतोब मिळाले आधारकार्ड!

जन्मानंतर अवघ्या पावणेदोन मिनिटांमध्ये आधार कार्डासाठी नोंदणी करणाºया साचीला यूआयडीएआयकडून त्वरीत आधारकार्ड देण्यात आले आहे. जन्माला येताच मुलीने एका नव्या विक्रमाला गवसणी घातल्यामुळे अग्रवाल कुटुंबियांमध्ये आनंद व्यक्त होत आहे.

मित्र आणि तहसीलदारांची मदत!

नवजात साचीचे आधार कार्ड काढताना मनिष अग्रवाल यांना त्यांचे मित्र परेश खत्री, शशी गिरी यांची मदत लाभली. तसेच तहसीलदार सुनील पाटील यांना माहिती दिल्यानंतर ते देखील हॉस्पीटलमध्ये पोहोचले होते. दरम्यान, डॉ अरविंद पाटील यांचीही याकामी मोलाची मदत झाली.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, मुलीच्या जन्मानंतर तिचे आधार कार्ड बनविले. साचीचे आधारकार्ड बनविताना विक्रम होईल अशी कोणतीही मनिषा बाळगली नव्हती. मात्र, कमी वेळात तिचे आधारकार्ड बनल्याचा मनस्वी आनंद आहे. प्रत्येकाने आपल्यासोबतच आपल्या पाल्याचेही आधारकार्ड ताबडतोब बनवावे, एवढीच अपेक्षा आहे.

- मनीष अग्रवाल, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावAdhar Cardआधार कार्ड