शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव मतदार संघात निवडणूक कामकाज प्रभावित 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 13:35 IST

शिक्षक, ग्रामसेवक, नगर परिषदेचे कर्मचारी यांनी स्पष्ट नकार दिल्याने निवडणूक कामकाज प्रभावित झाले आहे.

ठळक मुद्देशिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक व स्थानिक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषद व नगरपरिषदेचे मिळून ७४ शिक्षक, नगर परिषद कर्मचारी, ग्रामसेवक ९ असे कर्मचारी गैरहजर राहिले.

- योगेश फरपट खामगाव : भारत निवडणूक  आयोगाच्या आदेशान्वये खामगाव मतदारसंघाअंतर्गत तालुक्यातील २६४ मतदान केंद्रावर मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिर्क्षण कार्यक्रम १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबरपर्यंत राबविण्यात येत आहे. मात्र हे काम करण्यास शिक्षक, ग्रामसेवक, नगर परिषदेचे कर्मचारी यांनी स्पष्ट नकार दिल्याने निवडणूक कामकाज प्रभावित झाले आहे. दरम्यान ४ सप्टेंंबररोजी संध्याकाळी उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी मुकेश चव्हाण यांनी फौजदारी कारवाईचा इशारा दिल्याने एसडीओ विरुद्ध कर्मचारी अशी परिस्थिती खामगाव मतदार संघात निर्माण झाली आहे. शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक व स्थानिक कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कार्यक्रमासाठी सर्व बिएलओ व पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण १ सप्टेंबररोजी खामगाव येथील तहसिल कार्यालयात आयोजीत केले होते. या प्रशिक्षणास जिल्हा परिषद व नगरपरिषदेचे मिळून ७४ शिक्षक, नगर परिषद कर्मचारी, ग्रामसेवक ९ असे कर्मचारी गैरहजर राहिले. या सर्वांना उपविभागीय अधिकारी यांनी कारणेदाखवा नोटीस बजावल्या आहेत. जे कर्मचारी मतदार यादीचे काम करण्यास टाळाटाळ व किंवा बहिष्कार टाकत असतील त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिनिधी अधिनियम १९५० चे कलम ३२ अन्वये कारवाई निश्चित करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. हा गुन्हा सक्षम न्यायालयात शाबित झाल्यानंतर २ वर्ष कारावास, दंड अथवा २ वर्ष कारावास आणि दंड दोन्हीही, अशा शिक्षा होवू शकतात. महाराष्ट्र नागरी सेवा नियम (शिस्त व अपिल) १९७९ नुसार अथवा संबधित नियुक्ती प्राधिकारी यांच्या सेवाशर्ती विषयक नियमानुसार सेवेतून निलंबन, बडतर्फ करणे यासारख्या शिक्षा सुद्धा होवू शकतात. त्यामुळे संबधित कर्मचाºयांनी प्रशासनास वेठीत न धरता निवडणूकीचे काम सुरु करावे असे आदेश मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी मुकेश चव्हाण यांनी दिले आहेत. 

शिक्षक संघटना आक्रमक निवडणूकीचे काम कोणत्याही परिस्थितीत करणार नाही असा इशारा यापुर्वीच शिक्षक सेना व प्राथमिक शिक्षक संघटनेने दिला आहे. या कामामुळे शालेय कामकाजाकडे दुर्लक्ष होवून विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे संघटनांनी म्हटले आहे. त्यामुळे आम्ही कारवाईला सामोरे जायला तयार आहेत. पण निवडणूक काम करणार नाही अशी भूमिकाच शिक्षक, ग्रामसेवकांनी घेतली आहे.

टॅग्स :khamgaonखामगावElectionनिवडणूक