शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव: देयक संग्राहकांचे मुख्याधिकाऱ्यांनी टोचले कान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 14:44 IST

बदल्यांना विरोध करणाºया देयक संग्राहकांची मुख्याधिकाºयांनी चांगलीच कान उघडणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: स्थानिक नगर पालिकेच्या कर विभागात बदल्यांवरून निर्माण झालेला गोंधळ  थांबणार असल्याचे संकेत आहेत. बदल्यांना विरोध करणाºया देयक संग्राहकांची मुख्याधिकाºयांनी चांगलीच कान उघडणी केली. त्यानंतर कर विभागातील विस्कळीत झालेले कामकाज रुळावर येणार असल्याचे दिसून येते.प्रशासकीय दृष्टीकोनातून कर विभागाचे कामकाज सुरळीत करण्यासाठी नगर पालिकेच्या देयक संग्राहक आणि संबंधितांच्या बदल्या  २ आॅगस्ट रोजी करण्यात आल्या. यामध्ये गत अनेक वर्षांपासून एकाच वार्डातील कर वसुलीची जबाबदारी असलेल्यांची दुसºया वार्डात नियुक्ती करण्यात आली. यामध्ये सर्वच वार्डातील कर संग्राहक आणि संबंधित कर्मचाºयांची फेर रचना करण्यात आली. दरम्यान, या फेर रचनेमुळे दुखावलेल्या कर्मचाºयांनी नविन नियुक्ती देण्यात आलेल्या वार्डात काम करण्यास नाराजी दर्शविली होती. इतकेच नव्हे तर सहा. कर अधिक्षकांविरोधात असहकार आंदोलनही कर विभागात छेडण्यात आले होते. कोणत्याही परिस्थितीत बदलीच्या ठिकाणी काम करणार नसल्याचा इशाराही काही देयक संग्राहकांनी दिला होता. तर काहींनी राजकीय दबावातून बदली अथवा कामकाजातील बदलाचे ठिकाण बदलविण्यासाठी प्रयत्न चालविले होते. मात्र,  कर विभागातील बदलासंदर्भातील २ आॅगस्ट रोजीचा आदेश कायम ठेवत, आदेशातील नमूद केलेल्या ठिकाणी रूजू होऊन सहा. कर निरिक्षकांमार्फत अहवाल सादर करण्याचे निर्देश नुकत्याच एका बैठकीत दिले. त्यामुळे बदल्यांना तसेच बदलाला विरोध करणाºयांची चांगलीच कोंडी झाल्याचे दिसून येते.

 शिस्तभंगांच्या कारवाईचा इशारा!कर विभागातील २२ देयक संग्राहक आणि संबंधित कर्मचाºयांनी २ आॅगस्ट रोजी नमूद केलेल्या बदलीच्या ठिकाणी रूजू व्हावे. तसा अहवाल सहा. कर निरिक्षकांमार्फत तात्काळ सादर करावा. अन्यथा शिस्तभंगांच्या कारवाईस तयार रहावे, असा इशाराही मुख्याधिकाºयांनी शुक्रवारी दिल्याचे समजते. लोकमत वृत्तांची दखल!बदल्यांमुळे कर विभागात सुरू असलेल्या गोंधळाबाबत ‘लोकमत’ने  २९ आॅगस्ट रोजी सविस्तर वृत्त प्रकाशित केले. या वृत्ताची दखल घेत, पालिका प्रशासनाने देयक संग्राहक आणि संबंधितांना आपल्या कर्तव्याप्रती अवगत करून दिले. त्यामुळे आता कर विभागातील कामकाज सुरळीत होणार असल्याचे संकेत आहेत.

टॅग्स :khamgaonखामगावbuldhanaबुलडाणा