शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

‘फिकल स्लज’ व्यवस्थापनासाठी खामगाव, अकोटची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 12:35 IST

खामगाव :  केंद्र  शासनाच्या ‘सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट’अंतर्गत ‘फिकल स्लज’ व्यवस्थापनासाठी अमरावती विभागात खामगाव आणि अकोट या दोन शहरांची निवड झाली आहे.

ठळक मुद्दे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार या दोन्ही शहराच्या अभ्यासासाठी अभ्यासगटाची   स्थापना केली. ‘सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट’चा पुढील टप्पा म्हणून ‘फिकल स्लज’ व्यवस्थापनावर केंद्र शासनाकडून भर दिल्या जात आहे.घरगुती वापराच्या शौचालयाचे टाके ठराविक मुदतीत खाली करून मल नि:सारणावर भर दिल्या जाणार आहे.

- अनिल गवई

खामगाव :  केंद्र  शासनाच्या ‘सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट’अंतर्गत ‘फिकल स्लज’ व्यवस्थापनासाठी अमरावती विभागात खामगाव आणि अकोट या दोन शहरांची निवड झाली आहे. त्याअनुषंगाने केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वानुसार या दोन्ही शहराच्या अभ्यासासाठी अभ्यासगटाची   स्थापना केली असून, या अभ्यासगटाकडून शास्त्रोक्त पध्दतीने मल नि:सारणासाठी पाहणी केली जातेय.

घरगुती आणि सार्वजनिक वापराच्या शौचालय टाक्यांची ठराविक मुदतीत स्वच्छता म्हणजेच मल नि:सारण केले जात नाही. परिणामी, समाजाला विविध दृष्परिणामाला सामोरे जावे लागते. असे एका सर्वेक्षणात समोर आले आहे. तथापि, स्वच्छ भारत अभियानातंर्गत ‘सॉलीड वेस्ट मॅनेजमेंट’चा पुढील टप्पा म्हणून ‘फिकल स्लज’ व्यवस्थापनावर केंद्र शासनाकडून भर दिल्या जात आहे. यासाठी राज्यातील ९ तर अमरावती विभागातील दोन शहरांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये अकोट आणि खामगाव शहरातील सार्वजनिक तसेच घरगुती वापराच्या शौचालयाचे टाके ठराविक मुदतीत खाली करून मल नि:सारणावर भर दिल्या जाणार आहे. यासाठी ‘आॅल इंडिया इन्स्टीट्यूट फॉर लोकल सेल्फ, गव्हर्नमेंट’ या संस्थेचा एक चार सदस्यीय अभ्यासगट खामगाव शहरात दाखल झाला आहे. अशाच एका अभ्यासगटाकडून अकोट शहरात सर्व्हेक्षण केले जात आहे. 

शहरांच्या माहितीचे संकलन!

‘फिकल स्लज’ व्यवस्थापनातंर्गत अकोट आणि खामगाव या दोन्ही शहरांचा सामाजिक स्तर, भौगोलिक स्थिती, सामाजिक परिस्थितीसोबतच घरगुती शौचालयांची संख्या, सार्वजनिक शौचालयांची संख्या आदी माहितीचे संकलन ‘आॅल इंडिया इन्स्टीट्युट फॉर लोकल सेल्फ’ या संस्थेच्या चार सदस्यीय अभ्यासगटाकडून केले जात आहे.

पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार!

शास्त्रोक्त पध्दतीने मल नि:सारण होत नसल्याने नदी आणि नाल्यांमध्ये प्रदुषण वाढते. परिणामी, पर्यावरणाचा ºहास होतो. ही धक्कादायक बाब सर्वेक्षणात समोर आली आहे. त्यामुळे शास्त्रोक्त पध्दतीने मल नि:सारणावर शासनाचा भर आहे. त्याअनुषंगाने ‘फिकल स्लज’ व्यवस्थापनावर भर दिला जात असून, अभ्यासगटाच्या अहवालानंतर उपरोक्त शहरामध्ये ‘फिकल स्लज’ व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित करण्याचा मार्ग मोकळा होणार असल्याचे समजते.

मलाची योग्य विल्हेवाट!

सद्यस्थितीत टाक्यातील मलाची कुठेही विल्हेवाट लावण्यात येते. मात्र, फिकल स्लज व्यवस्थापनातंर्गत पालिका प्रशासनाकडून मलाची योग्य विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न केले जातील. सोबतच यावर प्रक्रीया करून खत निर्मितीसारख्या शक्यतांचीही पडताळणी केली जाईल. शौचालयाचे टाके ठराविक मुदतीत साफ करून देण्यासाठी नाममात्र कर आकारणीचाही प्रस्ताव पालिका स्तरावर विचाराधीन राहील. 

टॅग्स :khamgaonखामगावakotअकोट