शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव आगाराला दोन कोटींचे उत्पन्न

By admin | Updated: April 17, 2015 01:31 IST

४८ हजार पासधारक; खामगाव तालुक्यासह जिल्ह्यातील प्रवाशांचा समावेश.

खामगाव (जि. बुलडाणा) : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या खामगाव आगारातून जून २0१४ ते मार्च २0१५ या कालावधीत ४८ हजार प्रवाशांनी प्रवास सवलत योजनेचा लाभ घेतला आहे. महामंडळामार्फत प्रवाशांसाठी विशेष सवलती दिल्याने पासधारकांकडून खामगाव आगाराला जवळपास दोन कोटी रूपये उत्पन्न झाल्याचा अंदाज आहे. ह्यबहुजन हिताय बहुजन सुखायह्ण हे ब्रीद घेऊन राज्य परिवहन महामंडळ अहोरात्र प्रवाशांच्या सेवेसाठी तत्पर आहे. राज्यात दररोज ७२ लाख प्रवासी एसटीने प्रवास करतात. प्रवाशांना नियमित, निश्‍चित, सुरक्षित व आरामदायी सेवा देणारी आणि दैनिक १८ हजार वाहनांद्वारे ५६ लाख किमी अंतर पार करणारी महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे पाहिले जाते. खेड्यातील प्रत्येक गावात एसटी पोहचवण्याचे कामही महामंडळाने केले आहे. दिवसेंदिवस खासगी वाहतुकीची मोठय़ा प्रमाणात संख्या वाढली असतानाही एसटीने आपले अस्तित्व कायम ठेवले आहे. बुलडाणा जिल्ह्यातील सर्वांंंत जास्त विद्यार्थी खामगाव शहरात ग्रामीण भागातून एसटी पासद्वारे अप-डाउन करतात. यासोबत ग्रामीण भागात पाचवी ते दहावीच्या विद्यार्थिनींना मोफत प्रवासा सवलतीकरिता अहिल्यादेवी होळकर योजना सुरू आहे. विद्यार्थी पास, मासिक, त्रैमासिक, महाराष्ट्र दर्शन, वार्षिक सवलत कार्ड आदी विविध खास योजना दिल्या आहेत. त्याचबरोबर यात्रा, सण, उत्सव, लग्न समारंभ अशा विविध प्रसंगी व शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंंना शैक्षणिक सहलीसाठी (सवलत दराने) तसेच दिवाळी, उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रवासी वाढविण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. जून २0१४ ते मार्च २0१५ या काळात खामगाव आगारात प्रवासी सवलतीचा ४८ हजार प्रवाशांनी लाभ घेतला असून, खाजगी वाहनांच्या स्पर्धेत वर्षभर प्रवासी एसटीशी जुळलेले असल्याचे दिसुन येते.