शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव आगाराला ‘आषाढी’ पावली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2017 00:38 IST

खामगाव आणि परिसरातून असंख्य वारकऱ्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास केला. यातून खामगाव आगाराला २० लाख ७६ हजार ७७८ रुपयांचे उत्पन्न मिळाले.

अनिल गवई। लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी असलेल्या असंख्य वारकऱ्यांच्या ‘आषाढ’वारीमुळे खामगाव आगाराच्या उत्पन्नात चांगलीच भर पडली आहे. खामगाव आणि परिसरातून असंख्य वारकऱ्यांनी राज्य परिवहन मंडळाच्या बसमधून प्रवास केला. यातून खामगाव आगाराला २० लाख ७६ हजार ७७८ रुपयांचे उत्पन्न मिळाले.आषाढी एकादशीला पायीवारी करू न शकणारे भाविक रेल्वे आणि इतर प्रवासी साधनांचा वापर करून पंढरपूर गाठतात. तथापि, रेल्वेत आरक्षण अथवा जागा न मिळणारे भाविक एसटीला प्राधान्य देतात. त्यामुळे पंढरपूर यात्रेनिमित्त एसटीवरदेखील भाविकांची मोठी गर्दी असते. भाविकांच्या गर्दीचा अंदाज घेत, एसटी महामंडळाच्या खामगाव आगाराकडून पंढरपूर यात्रा विशेष बस गाड्यांचे नियोजन केले जाते. यावर्षीही खामगाव आगारातून ६१ गाड्यांचे नियोजन केले होते. २६ जुलैपासून अतिरिक्त बसेस खामगाव येथून पंढरपूरकडे सोडण्यात आल्या. दरम्यान, १, २ आणि ३ जुलै रोजी खामगाव आगारातून ३६ गाड्या सोडण्यात आल्या. सोबतच गुरुपौर्णिमेपर्यंत म्हणजेच २६ जून ते ९ जुलै या कालावधीत एसटीने ११६ फेऱ्या केल्या.