शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

खामगावचा पाणी पुरवठा वांध्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2017 00:46 IST

खामगाव : सततच्या भारनियमनामुळे खामगाव शहराचा पाणी  पुरवठा वांद्यात सापडला आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या  गेरू माटरगाव धरण क्षेत्रात दररोज ६ तास भारनियमन होत  असून याचा विपरीत परिणाम पाणी पुरवठय़ावर होताना दिसत  आहे. त्यामुळे ऐन सण उत्सवाच्या काळात खामगावकरांना  पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.

ठळक मुद्देगेरू माटरगाव धरण क्षेत्रात दररोज ६ तास लोडशेडिंगपालिकेचे तिसर्‍यांदा वीज वितरणला स्मरणपत्र!

खामगाव : सततच्या भारनियमनामुळे खामगाव शहराचा पाणी  पुरवठा वांद्यात सापडला आहे. शहराला पाणी पुरवठा करणार्‍या  गेरू माटरगाव धरण क्षेत्रात दररोज ६ तास भारनियमन होत  असून याचा विपरीत परिणाम पाणी पुरवठय़ावर होताना दिसत  आहे. त्यामुळे ऐन सण उत्सवाच्या काळात खामगावकरांना  पाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.गत काही दिवसांपासून सर्वत्र भारनियमनाचा त्रास सुरू आहे.  खामगाव शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गेरू माटरगाव धरण  परिसरातही दररोज ६ तास भारनियमन होत आहे. सकाळी ३ व  सायंकाळी ३ तास अशा दोन वेळेत हे भारनियमन केले जात  आहे. मात्र या भारनियमनाचा जास्त त्रास खामगावकरांना सहन  करावा लागत आहे. गेरू माटरगाव धरणावरून शहरातील  पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी येण्यासाठी ४ तासाचा वेळ लागतो.  त्यामुळे भारनियमनाचे ३ तास व पाणी येण्यासाठी लागणारे ४  तास असे एकुण ७ तास वाया जातात. दिवसातून दोन वेळा ३-३  तास भारनियमन होत असल्याने २४ तासातील १४ तास व्यर्थ  जात आहेत. उर्वरीत १0 तासातच पंपींग होते. शहराची आजची  पाण्याची गरज लक्षात घेता दररोज किमान २0 तास पंपींग होणे  आवश्यक आहे. मात्र भारनियमनामुळे हा कालावधी अध्र्यात  आला आहे. यामुळे शहराचा पाणी पुरवठा प्रभावित होताना  दिसत आहे. आधीच १0 दिवसावर पोहचलेल्या पाणी पुरवठय़ा त भारनियमनामुळे आणखी विलंब होत आहे. आधी  पावसाअभावी धरणात पाणी नसल्याने शहरवासीयांसमोर  जलसंकट उभे राहिले होते. परतीच्या पावसात गेरू माटरगाव  धरणात पाणी आल्याने समाधान व्यक्त होत आहे. मात्र पाणी  असतानाही लोडशेडींगमुळे खामगावकरांना पाण्यासाठी त्रास हो त आहे. 

पालिकेचे तिसर्‍यांदा वीज वितरणला स्मरणपत्र!-खामगाव शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गेरू माटरगाव धरण  क्षेत्रात भारनियमन रद्द करावे या मागणीचे पत्र आज पुन्हा  पालिकेने वीज वितरणला दिले आहे. हे पालिकेचे तिसरे पत्र  असून अद्याप भारनियमन बंद झालेले नाही. -एक लाखाच्यावर लोकसंख्या असलेल्या खामगाव शहराच्या  पाणी पुरवठय़ात भारनियमनामुळे वेळोवेळी व्यत्यय येत आहे.  त्यामुळे पाण्यासाठी खामगावकरांचा उद्रेक झाल्यास याला वीज  वितरण जबाबदार असेल, असे सदर पत्रात नमूद असल्याची  माहिती आहे.-वारंवार सूचना देवूनही पालिका प्रशासनाच्या पत्राला वीज वि तरणकडून केराची टोपली दाखविण्यात येत असल्याचे दिसते.