शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ताण कमी करण्यासाठी खाकीतही जोपासला जातो छंद !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:35 IST

काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ संचारबंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पाेलिसांवर साेपविण्यात आली ...

काेराेना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यभरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे़ संचारबंदीची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पाेलिसांवर साेपविण्यात आली आहे़ काेराेना संसर्गाच्या भीतीतही पाेलीस १२ तास कर्तव्य बजावत आहे़ अनेक पाेलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना काेराेनाची लागण झालेली आहे तसेच काहींचा मृत्यूही झाली आहे़ एकीकडे कामाचा ताण वाढत असताना दुसरीकडे याेग, संगीत, वृक्षराेपण, वाचन व इतर छंद जाेपासून पाेलीस अधिकारी, कर्मचारी आपला ताण कमी करत असल्याचे चित्र आहे़ बुलडाणा जिल्ह्यात २६०४ पाेलीस कर्मचारी आपले कर्तव्य बजावत आहे तसेच १८६ अधिकारी जबाबदारी पार पाडत आहे़ काेराेनामुळे आराेग्य व्यवस्थेबराेबरच पाेलिसांवरही ताण वाढल्याचे चित्र आहे़. या वाढलेल्या ताणातून पाेलीस आपले छंद जाेपासत असल्याचे चित्र आहे़

विविध वृक्षांची लागवड

कामाच्या ताणातून वेळ मिळाल्यानंतर मी विविध वृक्षांची लागवड करताे़ आपण लावलेल्या राेपट्याला पाणी देणे आणि त्याची झालेली वाढ पाहून वेगळाच आनंद मिळताे तसेच पाळीव प्राण्याबराेबर पक्ष्यांबराेबर वेळ घालवून ताण कमी करण्याचा प्रयत्न करताे़

बजरंग बन्साेड, अतिरिक्त पाेलीस अधीक्षक

याेगासने व वाचन

काेराेनामुळे कामाचा वाढलेला ताण याेगासने करून कमी करण्याचा प्रयत्न करताे तसेच नवीन आलेली पुस्तके वाचण्याचा मला छंद आहे़ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा छंद मी जाेपासताे़ याेगासने केल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते़

- जयसिंग पाटील, पाेलीस उपनिरीक्षक

योगा आणि फेरफटका

कोरोनाकाळात तसेच दैनंदिन ड्युटीवरील ताण आपण नियमित योगा आणि गावात फेरफटका मारून कमी करतो. ड्युटीवर असताना सदैव सकारात्मक दृष्टिकोनातूनच परिस्थिती हाताळण्याचा आपला प्रयत्न असतो.

- सुनील अंबुलकर,

शहर पोलीस निरीक्षक, खामगाव.

पुस्तकं वाचतो!

पोलीस दलातील ड्युटीच अशी आहे की, या ड्युटीत मनासारखे काहीच घडत नाही. चाकोरीबद्ध ड्युटी सांभाळताना ताण येणे स्वाभाविक आहे त्यामुळे पुस्तक वाचून आणि योगा करून ताण कमी करतो.

- संतोष वाघ,

रायटर, शहर पोलीस स्टेशन