शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
3
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
4
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
5
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
6
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
7
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
8
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
9
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
10
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
11
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
12
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
13
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
14
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
15
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
16
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
17
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
18
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
19
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
20
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

बाहेर गप्पा मारत बसलेल्यांची केली कोरोना चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:34 IST

सिंदखेडराजा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू असतानाही किनगावराजा येथे सोमवारी सार्वजनिक ठिकाणी गप्पा मारत बसलेल्या काही व्यक्तींची आरोग्य ...

सिंदखेडराजा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लागू असतानाही किनगावराजा येथे सोमवारी सार्वजनिक ठिकाणी गप्पा मारत बसलेल्या काही व्यक्तींची आरोग्य विभागाने अचानक कोरोना चाचणी केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला.

उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी, तहसीलदार सुनील सावंत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र साळवे, आरोग्य कर्मचारी हे दुसरबीड येथील लसीकरण कार्यक्रमाला भेट देण्यासाठी जात होते. किनगावराजा प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देण्यासाठी हे सर्व अधिकारी गावात प्रवेश करीत असताना सार्वजनिक ठिकाणी गप्पा मारत असलेला सात ते आठ जणांचा एक जमाव त्यांना दिसला. सोबत किनगावराजाचे ठाणेदार सोमनाथ पवार होते. त्यामुळे या जमावाला हटकून सोबत असलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना जमावाची कोरोना चाचणी करण्याच्या सूचना दिल्या. हे ऐकताच आजूबाजूला असलेले लोक पळाले पण या टोळक्याची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. अचानक झालेल्या या प्रकाराने परिसरात गोंधळ उडाला. परंतु या प्रयोगाने लोक विनाकारण रस्त्यावर फिरणार नाहीत हे नक्की. प्रशासनाने मोठ्या गावातील बाजारपेठेत असा प्रयोग केल्यास एकतर जमाव विनाकारण जमणार नाही, तर दुसरीकडे पॉझिटिव्ह असलेले रुग्ण यामुळे आढळून आल्यास मोठ्या प्रमाणावर वाढणारी संख्या आटोक्यात येऊ शकेल.