शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण क्षेत्राचे पावित्र्य जोपासा

By admin | Updated: October 29, 2014 22:58 IST

बुलडाणा येथे मुख्याध्यापकांचे राज्यस्तरीय संमेलनाच्या उद्घाटनपर भाषणात मारोती खेडेकर यांचे आवाहन

बुलडाणा : शिक्षणक्षेत्र हे नव्या पिढीला अधिक सजग व जागृत करून आधुनिक विकासाची दृष्टी देत असते. या क्षेत्राचे पावित्र्य जोपासण्याची जबाबदारी सर्वांची असून, मुख्याध्यापकांनी नेतृत्व करताना अधिक व्यापक जबाबदारी घेणे गरजेचे आहे. येणार्‍या काळात मुख्याध्यापकांसमोर निर्माण झालेले अनेक प्रश्न पाहता सर्वांनी संघटितपणे उभे राहिल्यास कुठलाही प्रश्न सहज सुटू शकतो. त्यामुळे संघटित होऊन संघर्षासाठी तयार रहा, असे आवाहन मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष मारोती खेडेकर यांनी केले.अखिल महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संयुक्त मंडळ तसेच पश्‍चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ माध्यमिक मुख्याध्यापक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सहकार विद्या मंदिराच्या सभागृहात तीन दिवसीय ५४ वे राज्यस्तरीय शैक्षणिक संमेलनाचा प्रारंभ झाला. यावेळी ते बोलत होते. संमेलनाचे उद्घाटन खा.प्रतापराव जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी आ.विक्रम काळे, शिक्षण संचालक सज्रेराव जाधव, माजी आमदार शिवाजीराव पाटील, मुख्याध्यापक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, एस.पी.जवळकर, स्वागताध्यक्ष विश्‍वनाथ माळी, समाधान सावळे, शिक्षणाधिकारी वैशाली ठग, युनूस पटेल, मनोहर सोनवणे आदी उपस्थित होते. या संमेलनात मुख्याध्यापक संघाच्या संकेत स्थळाचे उद्घाटन करण्यात आले तसेच स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले. संचालन अजिम नवाज राही यांनी केले. यावेळी मुख्याध्यापक संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र वानखेडे यांच्यासह विलास भारसाकळे, मधुकर पाटील आदी उपस्थित होते.