शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

जीवरक्षा बोट बनली जलपर्यटनाची आकर्षण बिंदू! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2017 00:14 IST

गुजरातमधील आलंग समुद्रतटावर आशियातील  सर्वात मोठय़ा शिपयार्डमध्ये मोडीत काढलेल्या जहाजावरील  जीवरक्षा बोट सध्या विवेकानंद आश्रमनिर्मित विवेकानंद  स्मारकाच्या कोराडी जलाशयात जलपर्यटनाची संधी उपलब्ध  करून देत आहे. या जलपर्यटनासह विवेकानंद स्मारकाचे  अलौकिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. 

ठळक मुद्देविवेकानंद स्मारकाच्या कोराडी जलाशयात जलपर्यटनस्मारक पाहण्याकरीता पर्यटकांची गर्दी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम: गुजरातमधील आलंग समुद्रतटावर आशियातील  सर्वात मोठय़ा शिपयार्डमध्ये मोडीत काढलेल्या जहाजावरील  जीवरक्षा बोट सध्या विवेकानंद आश्रमनिर्मित विवेकानंद  स्मारकाच्या कोराडी जलाशयात जलपर्यटनाची संधी उपलब्ध  करून देत आहे. या जलपर्यटनासह विवेकानंद स्मारकाचे  अलौकिक सौंदर्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. शुकदास महाराज यांचे विवेकानंद स्मारकनिर्मिती हे भव्य स्वप्न  होते. या स्मारकाच्या निर्मितीसाठी विवेकानंद आश्रमाचे विश्‍वस्त  मंडळ झपाटून कामाला लागले असून, त्यासाठी किमान १५ कोटी  रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. लोकवर्गणीतून हे स्मारक पूर्ण होणार  असून, सध्या त्याचे १0 टक्के काम पूर्णत्वास गेले आहे. स्वामी  विवेकानंद यांच्या अस्तित्वाची जाणीव या स्मारकावर व्हावी,  त्यांच्या वैचारिक व अध्यात्मिक सहवासाचा अनुभव व्हावा, तद्व तच मनशांती लाभावी, यासाठी हे स्मारक लाखो जीवांसाठी  आकर्षणस्थळ राहील, अशी अपेक्षा शुकदास महाराजांनी व्यक्त  केली होती. त्या अपेक्षापूर्तीसाठी सध्या प्रयत्न सुरू असून,  विवेकानंद स्मारकाच्या कोराडी जलाशयात जलपर्यटनाची संधी  उपलब्ध करून देण्यात आली आहे.

१0 टक्के काम पूर्णत्वास!कन्याकुमारीतील विवेकानंद स्मारकाच्या धर्तीवर कोराडी  जलाशयात विवेकानंद स्मारक असावे, अशी शुकदास  महाराजांची इच्छा होती. तशा प्रकारची कलाकृती स्वत:च  महाराजांनी सुचविली होती. या कलाकृतीनुसार सध्या काम सुरू  आहे. पर्यटकांसाठी उत्तम निवास व भोजन व्यवस्था, जलपर्यटन,  स्मारकावर ध्यानमंडप व स्वामी विवेकानंद यांच्या अध्यात्मिक,  वैचारिक साहित्याची शोभिका, विविध अत्याधुनिक साधनांची उ पलब्धता व त्याद्वारे विवेकानंदांच्या विचार व कार्याचा प्रचार-प्रसार  येथे निर्माणाधीन आहे. जगभरातून पर्यटक व भाविक येण्याची श क्यता गृहीत धरता, स्मारकनिर्मितीसाठी विविध तज्‍जञांचा  सल्लाही विवेकानंद आश्रमाच्या विश्‍वस्त मंडळातर्फे घेतला जात  आहे. या संपूर्ण स्मारकासाठी १५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित  आहे. सध्या दहा टक्के काम पूर्णत्वास गेले असून, त्यासाठी पाच  कोटींपेक्षा अधिक खर्च विवेकानंद आश्रमास आलेला आहे.

एकाच वेळी २२ प्रवासी घेऊ शकणार नौकायनाचा आनंद! गुजरातच्या समुद्रतटावर असलेले आलंग हे आशियातील मोडीत  निघालेली जहाजे पुनर्वापरसाठी तयार करणे किंवा त्यातील  लोखंड वेगळे काढण्याचे मोठे केंद्र आहे. वर्षाकाठी तेथे सरासरी  ६९ मोठी जहाजे मोडीत काढली जातात. या जहाजावर जीवरक्षा  बोटी ठेवलेल्या असतात. त्यांचा आपत्कालीन परिस्थिती वगळता  फारसा वापर होत नाही. त्यामुळे त्या अगदी सुस्थितीत असतात.  एकाच वेळी २२ प्रवासी वाहून नेण्याची आणि कोणत्याही स्थितीत  जलवाहतूक करण्याची या बोटींची क्षमता आहे. अशा प्रकारची  नवीन बोट घ्यायची असेल तर दहा ते बारा लाखांचा खर्च येतो;  परंतु भंगारात निघालेल्या जहाजावरील चांगल्यात चांगली बोट ही  दीड ते दोन लाखापर्यंत मिळते. विवेकानंद आश्रमाने नुकतीच  अशीच एक बोट दीड लाखापर्यंत विकत घेऊन ती कोराडी  जलाशयात तैनात केली आहे. या जलाशयात विवेकानंद स्मारक  मूर्तरूप घेत असून, या स्मारकाच्या भेटीसाठी पर्यटकांची मोठी  गर्दीही वाढली आहे. या पर्यटकांना जलपर्यटनाचा आनंद या  बोटीद्वारे मिळत आहे.