शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभर धुमाकूळ घालणारे चोरटे अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:56 IST

बुलडाणा : शेगावमध्ये दोन ठिकाणी आणि लोणारमध्ये एका ठिकाणी तसेच उंद्री येथून मोटारसायकल चोरणाºया वेगवेगळ्या घटनांमधील पाच अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे.

ठळक मुद्देपाच ताब्यात, तीन लाखांचा माल जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : शेगावमध्ये दोन ठिकाणी आणि लोणारमध्ये एका ठिकाणी तसेच उंद्री येथून मोटारसायकल चोरणाºया वेगवेगळ्या घटनांमधील पाच अट्टल गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद करण्यात यश मिळविले आहे. या चोरट्यांकडून दागिणे, घड्याळ, मोटारसायकल असा एकूण तीन लाख रुपयांचा माल हस्तगत करण्यात आला.गत काही दिवसांपूर्वी शेगाव येथील रोकडिया नगर आणि व्यंकटेश नगरमध्ये एकाच दिवशी घरफोडी करण्यात आली होती. शिवाय लोणार शहरातही एक घर फोडण्यात आले होते. या घरफोडींमधील आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू होता. स्थानिक गुन्हे शाखेकडून चोरट्यांची शहानिशा करून खबºयांना माहिती देण्यात आली होती. एपीआय विनायक कोरेगावकर यांच्या नेतृत्वातील पथक यावर काम करीत असतानाच घरफोडीचे आरोपी गावात असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर चिखली आणि मेहकर शहरातून एक तर दुसरबीडमधून दोन आरोपींना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.ताब्यात घेतलेल्या आरोपीने साथीदारांची माहिती दिली. अकोला येथील कारागृहात असलेल्या या साथीदारालाही कायदेशीर प्रक्रियेतून ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी दर्शना भुरभुर भोसले रा.पारडी ता.मेहकर, राजू तुळशीराम पवार रा. दुसरबीड, ता.सिंदखेडराजा, राजू ऊर्फ शिवानंद दिलीप पवार रा.जऊळका, लहू दगडू धंदरे रा. जऊळका ता. सिंदखेडराजा आणि शिवानंद बबन पवार रा. दुसरबीड या पाच आरोपींकडून सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. यामध्ये अंगठी, मणी मंगळसूत्र, डोरले, एकदाणी, कानातील वेल, रिंग, गोफ, सोन्याचे शिक्के आणि मनगटी घड्याळ हस्तगत करण्यात आले. अमडापूर येथे चोरलेली एक मोटारसायकलही आरोपींकडून मिळाली. एकूण तीन लाख रुपयांचा माल ताब्यात घेण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक शशिकुमार मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोल्ीास अधीक्षक संदीप डोईफोडे, पीआय प्रताप शिकारे यांच्या सुचनेनुसार एलसीबीच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.