पहुरजिरा ( जि. बुलडाणा) : गारपीट, अवकाळी पाऊस, नापिकी व शेतमालाला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून, शेतकर्यांच्या आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शेतमालाला रास्त भाव मिळाल्याशिवाय शेतकरी आत्महत्या थांबूच शकत नाही. सरकारचे धोरणही त्या बाबतीत निराशजनक आहे, असे प्रतिपादन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी केले. २९ मे रोजी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा भव्य शेतकरी मेळावा येथे पार पडला. या मेळाव्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. या मेळाव्यास खा. राजू शेट्टी यांच्यासह प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना. रविकांत तुपकर, डॉ. पोकळे, खविसं अध्यक्ष बाबुरावसेठ लोखंडकार, भाई वासुदेवराव उन्हाळे, शे.का. पक्ष नेते भगवान मिरगे, पहुरजिरा येथील सरपंच रेखा पारस्कर, पं.स. सदस्य वंदना पारस्कार, राम आखरे, राजू खोटरे, माधुरीताई सातव, जिल्हाध्यक्ष स्वा.से.सं. आदींची उपस्थिती होती. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंबादास पारस्कार होते. कार्यक़्रमाच्या सुरुवातीला भाऊसाहेब देशमुख यांच्या प्रतिमेस हारार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पहुरजिरा सरपंच व पं.स. सदस्य पारस्कार यांनी रविकांत तुपकर , खा. शेट्टी, स्वा.शे.सं. यांचा सत्कार केला.
रास्त भावाशिवाय आत्महत्या थांबणे अशक्य
By admin | Updated: June 1, 2015 02:01 IST