शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्हा रुग्णालयात 'कोरोना' संशयित रुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 14:46 IST

संशयित रुग्णांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : कोरोना विषाणूच्या संशयित रुग्णांच्या उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक खबरदारी घेण्याच्या अनुषंगाने आरोग्य विभागाने जनजागृती मोहीम सुरु केली असून त्यातंर्गत हा कक्ष उभारण्यात आला आहे.चीनमधील हुबेई प्रांतातील वुहान शहरात नव्याने आढळलेल्या कोरोना विषाणूमुळे न्यूमोनियाचे रुग्ण आढळून येत आहेत. केंद्र सरकारने मुंबई, दिल्ली, कलकत्ता येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांचे स्क्रिनींग, तपासणी सुरु केली आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव बुलडाणा जिल्ह्यात होऊ नये याकरिता आरोग्य विभागाच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय कार्यक्षेत्रात आरोग्य कर्मचाऱ्यांच्या वतीने सर्व्हेक्षण सुरु करण्यात येणार आहे. सर्व्हेक्षण करुन संशयित रुग्णांना उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांनी दिली.कोरोना विषाणूचा धोका पाहता नागरिकांनी गर्दीत जाणे टाळावे, स्वच्छता बाळगावी, असा सल्ला आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आला. श्वसन संस्थेचे आजार, सर्दी किंवा फ्ल्यूूसदृश्य लक्षणे असलेल्या व्यक्तिशी निकट सहवास टाळणे, हाताची नियमित स्वच्छता राखणे, अपुरे शिजवलेले अन्न खावू नये, खोकतांना, शिंकतांना नाका-तोंडाला रुमालचा वापर करावा, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी संपर्क टाळावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.जिल्हाधिकारी सुमन चंद्रा, जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांच्या मार्गदर्शनात कोरोना विषाणूसंदर्भात आरोग्य विभागाची बैठकही पार पडली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळकृष्ण कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी कोरोनासंदर्भात प्रतिबंधात्मक खबरदारीविषयी उपाययोजनांची चर्चा करण्यात करण्यात आली. जिल्ह्यात अद्याप एकही संशयीत आढळलेला नाही. (प्रतिनिधी)

एका चिनी पर्यटकाची जिल्ह्यास भेटचीनमधील एक नागरिक टूरिस्ट व्हिसावर गेल्या महिन्यात बुलडाणा येथे आला होता. दोन दिवस त्याने शहरात मुक्काम केला होता. जिल्ह्यातील प्रेक्षणिक स्थळे पाहल्यानंतर परत निघून गेला. सध्या जिल्ह्यात चीनचा एकही नागरिक वास्तव्यास नसल्याची माहिती पोलिस अधीक्षक कार्यालयातील पारपत्र विभागाकडून देण्यात आली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना