शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

शेगाव ते बाळापूर महामार्गावर वृक्ष लागवडीत अनियमितता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 14:55 IST

पाच हजार २५० झाडे लावल्याचे देयक काढण्यात आल्याची बाब माहिती अधिकारात समोर आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : बाळापूर-शेगाव मार्गावर दोन्ही बाजुंनी नियमानुसार सुमारे सहा हजार ४० झाडे लावणे बंधनकारक असताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला फक्त एक हजार ६०० झाडे लावण्यात आली. मात्र प्रत्यक्षात पाच हजार २५० झाडे लावल्याचे देयक काढण्यात आल्याची बाब माहिती अधिकारात समोर आली आहे.अधिकाऱ्यांच्या संगनमताने हा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत असून यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचेही माहिती अधिकारत प्राप्त माहितीवरून स्पष्ट होत आहे.विदर्भ पंढरी शेगांव येथे येणाºया भाविक भक्तांच्या सोयीकरीता आणि शहराच्या सौंदर्यात भर टाकणाºया बुलडाणा जिल्ह्यातील शेगांव-बाळापुर रस्त्याची सुधारणा करणे, ५० कोटी रुपयांच्या १२ कि.मी.लांबीच्या शेगांव-बाळापुर या राज्य  महामार्गाच्या कामास मात्री मंत्री तथा विद्यमान आमदार डॉ.संजय कुटे व   तत्काळीन जिल्हा परिषद अध्यक्षा उमा तायडे यांच्या उपस्थितीत आठ जुलै २०१७ रोजी प्रारंभ झाला होता.रस्त्याचे बांधकाम व रस्त्याचे दोन्ही बाजूने वृक्ष लावून सौंदर्यकरणं करण्याचे कंत्राट अकोला येथील ओबेरॉय कन्ट्रक्शन कंपनीला दण्यात आले होते. निवीदेनुसार १२ किमी पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा ६ हजार ४०० झाडे लावणे बंधनकारक असतांना संबंधीत कंत्राटदाराने फक्त १ हजार ६०० झाडेच लावली. सोबतच प्रत्येक रोपाची किंमत ५११ रुपयांची दाखवत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कथितस्तरावर हाताशी धरून लाखो रुयांचे देयक काढल्याचे या माहिती अधिकारात उघड झाले आहे.खामगाव येथील निविदेनुसार शेगाव-बाळापूर रस्त्याच्या दोन्ही बाजुला ६,४०० झाडे नियमानुसार लावणे बंधनकारक होते.परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग, खामगांव यांनी रेकॉर्ड बिलामध्ये ५,२५० झाडे लावल्याचे दर्शविले आहे. प्रत्यक्षात त्याठिकाणी १००० ते १६०० झाडे लावून १९ लाख २० हजार रुपयांचे देयक काढून शासनाची दिशाभूल केल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी कोणती कारवाई होते, याकडे लक्ष लागून राहले आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :buldhanaबुलडाणाfraudधोकेबाजी