शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

मजुरांच्या हजेरी पत्रकात  अनियमिता; मर्जीतील मजुरांनाच काम 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 16:10 IST

खामगाव : सामाजिक वनीकरणाच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील तब्बल ३६ क्षेत्रावरील वृक्ष लागवडीचा बोजवारा उडाला असतानाच, हजेरी पत्रकातील अनियमितेमुळे हजारो वृक्ष करपल्याचे दिसून येते.

- अनिल गवई

खामगाव : सामाजिक वनीकरणाच्या अनागोंदी कारभारामुळे तालुक्यातील तब्बल ३६ क्षेत्रावरील वृक्ष लागवडीचा बोजवारा उडाला असतानाच, हजेरी पत्रकातील अनियमितेमुळे हजारो वृक्ष करपल्याचे दिसून येते. मजूर निश्चितीच्या विलंबामुळे अनेक ठिकाणी झाडं सुकल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवडीवर शासनाकडून कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. वृक्ष लागवडीला प्रोत्साहनासाठी ठिकठिकाणी विविध उपक्रमही राबविण्यात येतात. मात्र, वृक्ष लागवड आणि संवर्धनाची जबाबदारी असलेल्या सामाजिक वनीकरण विभागाकडून याकडे सातत्यपूर्ण दुर्लक्ष केल्या जाते. परिणामी, शासनाच्या महत्वांकाक्षी विविध वृक्ष लागवड योजना मातीमोल ठरत असल्याचे दिसून येते. खामगाववनविभागातंर्गत वृक्ष लागवड योजनेचा सर्वाधिक बोजवारा उडाल्याचे दिसून येते. 

मजुरा संबधीत कामाचे नियोजन विलंबाने करण्यात येते. काही ठिकाणी चक्क मर्जीतील मजूरांना कामावर लावण्याचा खटाटोप केल्या जातो. विलंबाने नियोजन आणि हजेरी पत्रक  तयार केल्या जात असल्याने, मजुरांना आपली जबाबदारी निश्चित करण्यात आली अथवा याबाबतीत खात्री नसते. त्याला जबाबदारी माहिती होईपर्यंत एक-दोन दिवस उलटून जातात. त्यामुळे आठवडा अथवा त्यापेक्षा जास्त दिवस लागवड केलेल्या झाडांना पाणी घातले जात नाही. अशा परिस्थितीत अनेक झाडं करपतात. काही सुकतात. परिणामी वृक्ष लागवडीचा उद्देश सफल होत नाही. मात्र, याकडे वरिष्ठांचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. यासंदर्भात अधिक माहितीसाठी विभागीय वनाधिकारी एस.ए.पार्डीकर यांच्याशी संपर्क केला असता ते उपलब्ध होवू शकले नाही.

 

लागवड आणि मजूरही कागदोपत्री!

कागदोपत्री वृक्ष लागवडच नव्हे तर, मजूरांच्या हजेरी पत्रकातही  अनियमितता करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सामाजिक वनीकरण परिक्षेत्र खामगावतंर्गत एका क्षेत्रावर चक्क एका धनाड्य व्यक्तीला मजूर म्हणून कामावर दाखविण्यात आले. इतकेच नव्हे तर त्याचे वेतनही काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

चौकट...

आकस्मिक तपासणीत मजूर गैरहजर!

विहिगाव-नागापूर रस्त्यावर स्थळ पाहणी दरम्यान, लागवड अधिकाºयांनी केलेल्या पाहणीत सलग तीन वर्षांपर्यंत एकही मजूर कामावर नसल्याची बाब उघड झाली. मात्र, तत्कालीन लागवड अधिकाºयांचा अहवाल दाबण्यात येवून सामाजिक वन मजूराच्या भ्रष्टाचाराला बड्या अधिकाºयांकडून खतपाणी घालण्यात आले.

काम दुसरीकडे; कर्तव्य रोहयोवर!

स्थानिक स्वराज्य संस्था, होमगार्ड तसेच निमशासकीय सेवेसोबतच बुलडाणा जिल्ह्यातील एका धार्मिक संस्थेतील दवाखान्यात कामाला असलेल्या एका व्यक्तीला मजूर म्हणून रोहयोचे काम देण्यात आले. त्याच्या नावे मजुरीही काढण्यात आली. प्रत्यक्षात मात्र, हा व्यक्ती दुसरीकडेच कर्तव्यावर होता. काम दुसरीकडे आणि कर्तव्य रोहयोवर अशी अनेक उदाहरणं समोर आली असून, होमगार्ड असलेल्या एका व्यक्तीला रोहयोच्या कामावर दाखवून अपहारकेल्या प्रकरणी खामगाव न्यायालयाने, हिवरखेड येथील तत्कालीन सरपंच, सचिव, सदस्यांसह चौघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिलेत. सामाजिक वनीकरण विभागात वर्षांत मजूरांच्या हजेरीत कमालिची अनियमिता करण्यात आली. या फाईल आता हळूहळू बाहेर येत असल्याने, सामाजिक वनीकरण विभागातील वनमजूरासह अनेक बडे मासे अडकणार असल्याचे दिसून येते. 

टॅग्स :khamgaonखामगावforest departmentवनविभाग