शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्याच्या चुकीच्या याद्या सादर

By admin | Updated: May 12, 2017 08:00 IST

लोणार तहसील कार्यालयाचा भोंगळ कारभार : पैशाअभावी पेरणी जाणार लांबणीवर

किशोर मापारी लोणार : सन २०१६ - १७ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीन व कापूस पिकाचा विमा उतरविला नव्हता, अशा शेतकऱ्यांना सदर विमा लाभ रकमेच्या ५० टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यासाठी शासनाने मार्च २०१७ ला तालुक्यासाठी १४ कोटी रुपयांची मदत मंजूर केली होती; परंतु शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेल्या लोणार तहसील कार्यालयाच्या कारभारामुळे चुकीच्या याद्या भारतीय स्टेट बँक शाखा लोणार येथे सादर केल्या आहेत. यामुळे ऐन पेरणीच्या वेळेवर शेतकऱ्यांना पीक विम्याच्या पैशाअभावी पेरणी लांबणीवर टाकावी लागणार असल्याचे दिसून येत आहे.सतत चार वर्षांपासून दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळावा, यासाठी शासनाने सन २०१६-२०१७ साली ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला नाही. अशा शेतकऱ्यांनासुद्धा शासन स्तरावरून पेरणीसाठी मदत व्हावी, या प्रमुख उद्देशाने लोणार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी सदर विमा लाभ रकमेच्या ५० टक्के रक्कम अनुदान स्वरूपात देण्यासाठी शासनाने मार्च २०१७ ला तालुक्यासाठी १४ कोटी रुपयांची मदत मंजूर केली होती. लोणार तहसील कार्यालयाने शेतकऱ्यांच्या याद्या भारतीय स्टेट बँकेत सादर केल्या . सदर याद्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या नावासमोर चुकीचे खाते नंबर, अर्धवट खाते नंबर अशा त्रुटी असल्यामुळे बँक अधिकारी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक अनुदानाची रक्कम टाकू शकले नाहीत. पीक विम्याच्या अनुदानाची रक्कम खात्यात का जमा झाली नाही, याबाबतचा जाब शेतकरी लोणार तहसील कार्यालयाच्या तलाठी आणि महसूल अधिकाऱ्यांना विचारू लागले असता, बँकेत याद्या दिल्या आहेत; परंतु बँकेने अजून खात्यात अनुदानाची रक्कम जमा केली नाही. बँक व तहसील कार्यालय यांच्या चकरा मारून त्रस्त झाल्याने शेतकऱ्यांचा रोष वाढला. तहसीलदार सुरेश कव्हळे यांनी भारतीय स्टेट बँक शाखा व्यवस्थापक अशोक गवई यांची भेट घेतली असता, सदर याद्यांमध्ये अनेक प्रकारच्या चुका असल्याचे शाखा व्यवस्थापक अशोक गवई यांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर ही बाब उघडकीस आली, त्यामुळे आल्या पावली तहसीलदारांना परत फिरावे लागले. महसूल विभागाच्या हलगर्जीमुळे पीक विमा अनुदानाच्या मदतीपासून शेतकरी वंचित राहत आहेत. यामुळे पेरणी लांबणीवर पडून होणाऱ्या शेतकऱ्यांचे नुकसान कोण भरून देणार, असा प्रश्न शेतकरी वर्गाकडून विचारला जात आहे. ज्या शेतकऱ्यांच्या नावासमोर खाते नंबर अचूक असेल त्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करायला हवी. ज्यांचे खाते नंबर आणि नावे चुकलेले असतील, अशी नावे बाजूला ठेवायला हवीत. त्यामध्ये दुरुस्ती करून देण्यास तयार आहोत.- सुरेश कव्हळे,  तहसीलदार, तहसील कार्यालय, लोणार.पीक विमा अनुदानाच्या याद्या महसूल विभागाने सादर केल्या; परंतु त्यामध्ये अनेक त्रुटी असल्यामुळे खात्यात रक्कम जमा करता आली नाही. याद्या दुरुस्तीबाबत तहसीलदारांना सांगण्यात आले आहे. याद्या दुरुस्ती होताच शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल.- अशोक गवई,  शाखा व्यवस्थापक, भारतीय स्टेट बँक,शाखा लोणार.