शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

इंटरनेट, काटरून्सला पसंती

By admin | Updated: November 13, 2014 23:51 IST

बुलडाणा जिल्ह्यातील लोकमत सर्वेक्षण, मुलांचे भावविश्‍व बदत असल्याचे वास्तव.

बुलडाणा : मैदानी खेळापेक्षाही वय वर्षे १२ ते १४ वयोगटातील बालकांच्या पसं तीला इंटरनेट व काटरून्स सोबतच मोबाईलसुद्धा उतरला आहे. पुस्तकांचे वाचन कमी होत असल्याचे दिसून येतानाच व्यवसाय म्हणून आजही डॉक्टरची भुरळ बालमनावर असल्याचे चित्र लोकमत सर्वेक्षणातून समोर आले आहे.बुलडाणा शहरातील निवडक शाळांमधील वर्ग ५ ते ७ पर्यंंतच्या विद्या र्थ्यांना या सर्वेक्षणात प्रश्न विचारले असता हे चित्र समोर आले. तुम्हाला घरी कोण रागावतो, या प्रश्नावर ६0 टक्के मुले आई, ३२ टक्के मुले वडील, तर ८ टक्के मुलांनी कोणीच नाही, हे उत्तर दिले. आईच्या प्रेमाचा धाक सर्वांनाच आहे. टीव्हीवरचा कोणता कार्यक्रम सर्वाधिक आवडतो, हे विचारल्यावर तब्बल ६८ टक्के मुलांनी कार्टून तर १५ टक्के मुलांनी चित्रपट, ११ टक्के मुलांनी मालिका व ६ टक्के मुलांनी गेम्स या पर्यायाची निवड केली. इंटरनेटचा वाढता वापर मुलांमध्येही होताना दिसत आहे. संगणक शिक्षण शाळांपासूनच मिळत असल्याने ६४ टक्के मुलांना इंटरनेटचा वापर माहीत आहे. ऑनलाईन गेम्स खेळण्यासाठीच हा वापर सर्वाधिक होतो, हे विशेष तर १२ टक्के मुलांनी नाही व २४ टक्के मुलांनी कधी कधी, असे उत्तर दिले.त्याचप्रमाणे मोबाईल हाताळण्यामध्ये सर्वच बालक आता निष्णात झाले आहेत. तब्बल ७२ टक्के बालकांनी घरातल्या मोठय़ांचे मोबाईल घेऊन त्यावर गेम्स किंवा इतर अँप्सचा वापर केला आहे.लहानपणापासून घराघरात मुलांवर अपेक्षांचे ओझे असते, त्यामुळे त्यांनी पुढे काय व्हावे, याचे बाळकडू पालकांकडून रोज मिळत असते, त्याचाच परिणाम म्हणजे या सर्वेक्षणात तुम्हाला काय व्हायला आवडेल, असे विचारले असता तब्बल ४८ टक्के बालकांनी डॉक्टर, हेच उत्तर लिहिले, २0 टक्के बालकांना इंजिनिअर व्हावे वाटते, प्रत्येकी ८ टक्के बालकांनी उद्योजक व शिक्षक तर ६ टक्के बालकांनी वकील होण्यासाठी पसंती दिली. प्रातिनिधीक स्वरूपात असलेल्या या सर्वेक्षणातून बालकांच्या बदलत्या भावविश्‍वाची ओळख यानिमित्ताने होत असून, येणारी पिढी ही टेक्नोसेव्ही होत असल्याचे दिसत आहे.