शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

आयुष्यातील अविभाज्य घटक म्हणजे आनंद

By admin | Updated: March 14, 2016 01:44 IST

प्रसाद कुलकर्णी यांनी शिकविली जगण्याची कला

बुलडाणा : जीवन म्हणजे परमेश्‍वराने दिलेली अमूल्य देणगी आहे. जीवनात मार्गक्रमण करीत असताना सकारात्मकतेची कास धरा आणि या देणगीचे सोने करा, मानवी जीवनातील अविभाज्य घटना म्हणजे आनंद आहे. त्यामुळे दु:ख आणि निराश भावनांचा कोपरा दाखवत नेहमी आनंदी राहा, अशा मौलिक सल्ल्याचे वाण प्रसाद कुलकर्णी यांनी दिले. राज्यस्तरीय बालकुमार युवासाहित्य संमेलनाच्या आज दुसर्‍या दिवशी आयोजित ह्यआनंदयात्राह्ण या बहुढंगी एकपात्री कार्यक्रमातून त्यांनी उपस्थिताना जीवन जगण्याची कला शिकविली.विनोदी किस्से, हकीकती, काव्य, अनुभवांची सुंदर गुंफण करीत कुलकर्णी यांनी हा कार्यक्रम तितक्याच सफाईदारपणे सादर केला. हास्याच्या खळखळाटासह विविध विषयांवर त्यांनी हाउसफुल्ल भरलेल्या गर्दे वाचनालय सभागृहातील उपस्थित प्रत्येक श्रोत्यांना अंतर्मुखही केले. दुपारी ३ वाजता ह्यआनंदयात्राह्ण ला प्रारंभ झाला आणि त्यानंतर दीड तासांहून अधिक काळ रंगलेली ही यात्रा कधी संपली, याचे भानही उरले नाही. उपस्थितांशी सुसंवाद साधत कुलकर्णी यांनी ह्यआनंदयात्राह्ण उत्तरोत्तर खुलवत नेली. ते म्हणाले, ह्यआपले जीवन म्हणजे परमेश्‍वराने दिलेला कोरा धनादेश आहे. सकाळ झाली की, हा धनादेश तो मानवाच्या हाती देतो. त्याचा उपयोग कसा करायचा, हे ज्याने त्याने पाहायचे असते, ठरवायचे असते. प्रत्येक जण ह्यनिगेटिव्ह माइंडह्ण ने वाटचाल करीत आहे. जीवन ही सुंदर देणगी आहे, याचा विसर पडत चालला आहे. सुख-दु:ख, वादविवाद, हेवेदावे, संघर्ष आदी तर प्रत्येकाच्या वाट्याला येतातच; पण त्यातही सकारात्मकतेचा विचार केल्यास जीवन सुंदर बनण्यास वेळ लागणार नाही. प्रख्यात तबलावादक उस्ताद जाकिर हुसेन यांचे तबलावादन ऐकण्यात तल्लीन झालो असता, उद्या डब्यात भाजी काय करायची? असा बायकोने विचारला प्रश्न आणि व्यक्तीच्या प्रवृतीनुसार त्यांना होणारे आजार, या विविध गमतीदार उदाहरण देताना कुलकर्णी यांनी उपस्थितांमध्ये हशा पिकविला. नातेसंबंध, नातीगोती किती महत्त्वाची असतात, कुठल्या वळणावर ती निर्माण होतात, पुढे ती जपली जातात की तडा जातो, आदी बाबी त्यांनी विविध हकीकतींच्या माध्यमातून मांडल्या. ह्यप्रेम घेता आले पाहिजे, प्रेम देता आले पाहिजेह्ण, असा मौलिक सल्लाही दिला. यावेळी प्रमुख अतिथी चित्रपट कलावंत विनोद वनवे, डॉ.देपक लद्दड उपस्थित होते. संचालन रणजित राजपूत व आभार प्रा.विलास सपकाळ यांनी मानले.