शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
6
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
7
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
8
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
9
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
10
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
11
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
12
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
13
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
14
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
15
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
16
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
17
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
18
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
19
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
20
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील आठ फळ पिकांना विमा संरक्षण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 01:23 IST

बुलडाणा : सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये  पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना जाहीर  करण्यात आली आहे.  जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा,  मोसंबी,  केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, डाळिंब व लिंबू या आठ फळ िपकांकरिता राबविण्यात येणार असून, योजनेंतर्गत फळ  पीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे,  तसेच गारपीट नुकसानाकरिता स्वतंत्र विम्याची मदत शेतकर्‍यांना  मिळणार आहे. 

ठळक मुद्देआंबिया बहार विमा योजना गारपीट नुकसानकरिता मिळणार स्वतंत्र विम्याची मदतफळ पिकांना विम्याचे कवच

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : सन २0१७-१८ साठी आंबिया बहार व गारपीटमध्ये  पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना जाहीर  करण्यात आली आहे.  जिल्ह्यामध्ये ही योजना संत्रा,  मोसंबी,  केळी, द्राक्ष, आंबा, पेरू, डाळिंब व लिंबू या आठ फळ िपकांकरिता राबविण्यात येणार असून, योजनेंतर्गत फळ  पीकनिहाय विमा संरक्षण रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे,  तसेच गारपीट नुकसानाकरिता स्वतंत्र विम्याची मदत शेतकर्‍यांना  मिळणार आहे. आंबिया बहार व गारपीटमध्ये पुनर्रचित  हवामान आधारित फळ  पीक विमा योजना कृषी विभागाकडून राबविण्यात येत आहे.  गारपीटमध्ये ही योजना कर्जदार शेतकर्‍यांना सक्तीची असून,  बिगर कर्जदार शेतकर्‍यांना ऐच्छीक आहे. योजना चार  समूहांमध्ये राबविण्यात येणार आहे. समूह एक मध्ये इफको  टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, समूह दोन व  तीनमध्ये एचडीएफसी इर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी व समूह  चारमध्ये बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनीमार्फत  राबविण्यात येणार आहे. शेतकर्‍यांना विमा हप्ता दर संरक्षित  रकमेच्या पाच टक्के किंवा वास्तवदश्री दर यापैकी जी कमी  असेल ती रक्कम शेतकर्‍यांनी भरावयाची आहे. उर्वरित विमा  हप्ता केंद्र व राज्य शासन समप्रमाणात अदा करणार आहे. फळ  पीक विमा योजनेत काही तालुके व महसूल मंडळ समाविष्ट  करण्यात आले आहेत. त्यामध्ये द्राक्ष या फळ पिकासाठी   बुलडाणा तालुक्यातून मंडळ बुलडाणा, मोताळा तालुक्यातून  बोराखेडी, जळगाव जामोद तालुक्यातून जळगाव जामोद,  संग्रामपूर तालुक्यातून बावनबीर व सोनाळा या मंडळांचा  समावेश आहे. मोसंबी या फळ पिकासाठी सिंदखेड राजा,  सोनोशी, किनगाव राजा, दुसरबीड, मलकापूर पांग्रा, शेंदूर्जन,  साखरखेर्डा या मंडळांचा समावेश आहे. डाळिंब फळ पिकासाठी चिखली, पेठ, चांधई, हातणी, धोडप,  अमडापूर, एकलारा, उंद्री, कोलारा, शेलगाव अटोळ, मेरा खु.,  बुलडाणा, धाड, शेलापूर, बोराखेडी, मोताळा व धामणगाव  बढे, पिंपळगाव काळे  या मंडळांचा  समावेश आहे. पेरू या  फळ पिकासाठी साखळी बु., चिखली, हातणी व चांदई, मेहकर  तालुक्यातून डोणगाव, हिवरा आश्रम, शेलगाव देशमुख  या  मंडळांचा  समावेश आहे.  केळी या फळ पिकासाठी बुलडाणा,  बोराखेडी, मोताळा, पिंप्री गवळी, पिंपळगाव देवी, धामणगाव  बढे, रोहिणखेड, जळगाव जामोद,  बावनबीर, सोनाळा, संग्राम पूर, मेरा खु.,  हिवरखेड, काळेगाव, वझर, लाखनवाडा, पिं पळगाव राजा, डोणगाव, हिवरा आश्रम, वरवंड, जानेफळ,  नायगाव द. या मंडळांचा  समावेश आहे.  संत्रा या फळ  िपकासाठी डोणगाव, हिवरा आश्रम, जानेफळ, नायगाव द.,  मेहकर, शेलगाव देशमुख, बिबी, अंजनी खुर्द, सुलतानपूर,  लोणार, हिरडव, आडगाव, लाखनवाडा, हिवरखेड, काळेगाव,  वझर,  बावनबीर व सोनाळा, शेंदूर्जन, साखरखेर्डा, मलकापूर  पांग्रा, अंढेरा व दे.मही, जळगाव जामोद- जामोद या मंडळांचा   समावेश आहे.  आंबा या फळ पिकासाठी सिंदखेड राजा या मंडळांचा  समावेश  आहे. या योजनेनुसार कमी-जास्त पाऊस, वेगाचा वारा, गारपीट व सा पेक्ष आद्र्रता या हवामान धोक्यापासून निर्धारित केलेल्या  कालावधीत शेतकर्‍यांना विमा संरक्षण आणि आर्थिक सहाय्य  देण्यात येणार आहे.  शेतकर्‍यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता  जास्तीत जास्त प्रमाणात या योजनेत सहभागी व्हावे, असे  आवाहन कृषी विभागाने केले  आहे.   

अशा आहे प्रस्ताव सादर करण्याच्या मुदतीआंबिया बहारातील मोसंबी, केळी, पेरू, डाळिंब या पाच फळ  िपकांसाठी शेतकर्‍यांनी विमा प्रस्ताव बँकांकडे ३१ ऑक्टोबर  २0१७ पर्यंत सादर करावयाचे आहे. तसेच द्राक्ष फळ पिकाकरि ता १५ ऑक्टोबर, लिंबुकरिता १४ नोव्हेंबर, आंबा फळ  िपकासाठी ३१ डिसेंबर तर संत्रा व काजू फळ पिकाकरिता ३0  नोव्हेंबर २0१७ पर्यंत प्रस्ताव बँकांना सादर करावयाचे आहेत.