शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेगावात पार पडला प्रेरणादायी व आदर्श लग्न सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2019 18:08 IST

शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थान चे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील  यांचे नातू तथा संस्थान चे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांचे सुपुत्र हरीहर पाटील व  शिवानी यांचा शुभ विवाह रविवारी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अगदी साध्या पद्धतीने पार पडला.

- अनिल उंबरकार  शेगाव : येथील श्री गजानन महाराज संस्थान चे व्यवस्थापकीय विश्वस्त कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील  यांचे नातू तथा संस्थान चे कार्यकारी विश्वस्त निळकंठदादा पाटील यांचे सुपुत्र हरीहर पाटील व  शिवानी यांचा शुभ विवाह रविवारी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे अगदी साध्या पद्धतीने पार पडला.शहरातील श्रीमंत तसेच अध्यात्माचा वारसा चालविते असलेले कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील गुरूवर्य तुकाराम महाराज सखारामपूरकर,शंकर महाराज जागृती आश्रम शेलोडी, शंकरबाबा पापळकर वझ्झर जि अमरावती,श्री गजानन महाराज संस्थान चे अध्यक्ष नारायणराव पाटील,आचार्य हरीभाऊ वेरूळकर, वारकरी महामंडळाचे अध्यक्ष  ह भ प प्रकाशबुवा जवंजाळ प्रकाश पोहरे, खा. संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर,आ. आकाश फुंडकर , माजी आमदार नाना कोकरे, जि पो अधिक्षक दिलीप पाटील भुजबळ, नगराध्यक्षा सौ शकुंतलाबाई बुच, तहसीलदार शिल्पा बोबडे यांचेसह आप्तेष्ट व शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांची उपस्थिती होती. 

विठ्ठल मुर्ती ठरली आकर्षण....लग्न मंडळाचे प्रवेशद्वाराजवळील विठ्ठलाची मुर्ती  तसेच वर वधू चे स्टेजवर श्री गजानन महाराज चा फोटो सर्वांचे आकर्षण ठरलेत. लग्न मंडपात प्रवेश करतेवेळी प्रत्येक जण विठ्ठल दर्शन घेवून पुढे जात होता. येथेही जणू पंढरीत आलो की काय असे प्रत्येकाला जाणवत होते. 

भाऊंचे अभिवादन....मंगलाष्टके झाल्यावर सुलग्न लागले. प्रथम आजोबा म्हणून कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील व आजी सौ उमादेवी पाटील यांनी वधू-विरांना आशिर्वाद दिला. व स्टेजवरून शिवशंकरभाऊ पाटील यांना वराडी व पाहुणे मंडळाला हात जोडून अभिवादन केले.

प्रेरणादायी सोहळा...संतांचा वारसा जपणारा कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील व कुटूंबियांनी मराठमोळ्या व साध्या पध्दतीने चि. हरिहर यांचा विवाह पार पाडला. कुठलाही बडेजाव न करता एखाद्या सामान्य नागरिकांचे कुटुंबातील लग्नाप्रमाणे विवाह सोहळा पार पाडून शेगावच्या पाटील घराण्याने आदर्श निर्माण केला असून इतरांना हा विवाह सोहळा प्रेरणा देणारा ठरला आहे.- शंकरबाबा पापळकरवझ्झर आश्रम जि अमरावती

टॅग्स :Shegaonशेगावbuldhanaबुलडाणा