शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

बुलडाणा जिल्ह्यात पिकांवर आता किडीचे संकट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 11:47 IST

Insect crisis on crops in Buldana district now : रिमझीम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे.

- ब्रह्मानंद जाधवलोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली होती. दरम्यान, दोन दिवसांपासून पावसाच्या हजेरीने पिकांना संजीवनी मिळाली आहे. परंतु काही भागात रिमझीम पाऊस व ढगाळ वातावरणामुळे पिकांवर किडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. सोयाबीनवरही ‘गर्डल बिटल’चा प्रादुर्भाव झाला असून, सोयाबीनच्या झाडाचे शेंडेच गायब होत असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यात मृग नक्षत्रात झालेल्या चांगल्या पावसावर जवळपास ६० टक्के पेरणी पूर्ण झाली होती. परंतु त्यानंतर पाऊस नसल्याने ही पीके अडचणीत सापडली होती. दोन दिवसापासून झालेल्या पावसामुळे या पिकांना आता संजिवनी मिळाली आहे. आता ६४ टक्के पेरणी झालेली आहे. त्यामध्ये सर्वाधिक सोयाबीन पीक आहे. सध्या वातावरणातील बदलाने पिकांना कडीचा फटका बसत आहे. सोयाबीन पिकांमध्ये खोड पोखरणाऱ्या किडींमध्ये प्रामुख्याने खोडमाशी आणि चक्रभुंगाचा प्रादुर्भाव अधिक आहे. इतर किडींच्या तुलनेत या दोन किडींचा प्रादुर्भाव सोयाबीनवर मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे. चक्र भुंग्याच्या प्रादुर्भावामुळे सुमारे ३५ टक्क्यापर्यंत, तर खोडमाशी मुळे ६० ते ७० टक्क्यापर्यंत नुकसान होऊ शकते. त्यामुळे या किडींचे वेळीच योग्य नियोजन करण्यासाठी शेतकरी वेगवेळ्या औषधांची फवारणी करत आहेत. सोयाबीन शिवाय मूग, उडीद, चवळी, तूर, भुईमूग, मिरची, कारली या पिकावरही ‘गर्डल बिटल’चा प्रादुर्भाव होत आहे. या किडीच्या प्रादुर्भावाने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.

या दिवसात खोडमाशी, खोडकीड, ‘गर्डल बिटल’चा प्रादुर्भाव सोयाबीन पिकावर जाणवतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. थायामेथोक्झाम आणि लॅम्बडा सायहॅलोथ्रिन एकत्र चार मिली १० लिटर पाण्यात एका पंपाला देणे आवश्यक आहे.- डॉ. सी. पी. जायभाये, कृषी शास्त्रज्ञ.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेती