शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बेहिशोबी युरिया वाटप प्रकरणाची चौकशी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 11:12 IST

जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात कृषी केंद्र निहाय शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या युरीयाची पडताळणी करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील एका कृषी केंद्रावरून चार शेतकऱ्यांना कथितस्तरावर वाटप करण्यात आलेल्या एक हजार २८ युरीया खताच्या बॅगांचे कथितस्तरावरील प्रकरण समोर आल्यानंतर कृषी विभागाकडून जिल्ह्यातील १३ ही तालुक्यात कृषी केंद्र निहाय शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेल्या युरीयाची पडताळणी करण्यात येत आहे.दरम्यान, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी नरेंद्र नाईक यांनी चार आॅगस्ट रोजी जिल्ह्यातील१३ ही तालुक्यात अनुषंगीक विषयान्वये पडताळणी करणाºया अधिकारी कर्मचारी व तालुका अधिकाºयांची आॅनलाईनच सविस्तर आढावा बैठक घेऊन युरीया खत वाटपाच्या एकंदरीत स्थितीची पडताळणी त्वरित करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती सुत्रांनी दिली.दुसरीकडे पुणे येथील कृषी आयुक्त कार्यालयाच्या निर्देशानुसारही जिल्ह्यातील कृषी केंद्रांची तपासणी व पाणी करण्यात येत आहे. नांदुरा तालुक्यातील शेंबा येथील एका कृषी केंद्रावरून चार शेतकºयांच्या नावे १,०२८ बॅग युरिया खत उचलल्या गेल्याचे समोर आल्यानंतर युरीया खत प्रकरण चांगलेच गाजत आहे.

‘त्या’ केंद्रावरून खत घेणाºया पडताळणी सुरूशेंबा येथील कृषी केंद्रावरून खत वाटप झालेल्या १,३०० शेतकºयांची पडताळणी सध्या कृषी विभाग करत आहे. कृषी सहाय्यक व तालुका अधिकारी प्रत्यक्ष शेतकºयांशी संवाद साधून त्यांना किती खत मिळाले, याची सविस्तर माहिती घेत आहे. आॅनलाईन खतावणीसह अनुषंगीक कागदपत्रेही तपासण्यात येत आहे.

तालुका निहाय शेतकºयांकडून माहिती संकलन१३ ही तालुक्यातील कृषी केंद्रवरून किती शेतकºयांनी खत नेले; तसेच ज्या शेतकºयांनी वारंवार खत नेले, अशांची कृषी केंद्रावरील संगणाकातील नोंदी तपासून पडताळणी करण्यात येत आहे. सहा आॅगस्ट रोजी याबाबतचा अंतिम अहवाल प्राप्त होण्याचे संकेत आहेत.

जिल्ह्यातील शेतकºयांना वाटप करण्यात आलेल्या युरियाची कृषी केद्रनिहाय तपासणी करण्यात येत आहे. त्यानुषंगाने तालुकानिहया पथके सक्रीय झाली असून सहा आॅगस्ट पर्यंत याचा अंतिम अहवाल प्राप्त होण्याची शक्यता आहे. त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची वस्तुस्थिती स्पष्ट होईल.नरेंद्र नाईक, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी, बुलडाणा

टॅग्स :buldhanaबुलडाणाAgriculture Sectorशेती क्षेत्र