उंद्री : केंद्र सरकारच्या महागाईच्या धोरणामुळे सामान्य जनता त्रस्त झाली आहे. या वाढत्या महागाईच्या विरोधात उंद्री शहर काँग्रेस व युवक काँग्रेसच्यावतीने अभिनव आंदोलन करण्यात आले. २९ जुलैला येथील चिखली-खामगाव महामार्गावर पडलेल्या खड्डय़ात बेशरमच्या झाडासह फलक लावण्यात आले; तसेच केंद्र सरकारच्या महागाई धोरणाचा निषेध करण्यात आला.पेट्रोल व डिझेलच्या वाढत्या दरासोबतच एस.टी. भाडेवाढ, भाजीपाल्याचे गगणाला भिडलेले भाव, रेल्वे भाडेवाढ या मूलभूत समस्यांनी ग्रासलेला सामान्य माणूस या महागाईत होरपळून निघत असल्याने सदरचे आंदोलन करण्यात आले. जिल्हा युवक काँग्रेस महासचिव राम डहाके यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनात रमेश आंभोरे उपाध्यक्ष चिखली तालुका, अनवर खासाब शहर अध्यक्ष काँग्रेस अल्पसंख्यक, शे.बुढनभाई, अशोक पाटील, गणेश भगत, श्याम उगले, राम बोरपी, रवी तरळकर, शे.गुलाब पठाण, राजवीर रावळकर, शे.इरफान, प्रदीप जाधव, मनोज लाहुडकार, तुषार म्हळसने आदी सहभागी झाले होते.
महागाई विरोधात उंद्रीत अभिनव आंदोलन
By admin | Updated: July 30, 2014 00:08 IST