अकोला : उशिरा आलेल्या पावसाचा फटका विदर्भातील खरीप पिकांना बसल्यानंतर, रब्बीतील पिकांनीदेखील शेतकर्यांना मेटाकुटीस आणण्यास सुरुवा त केली आहे. पाऊस नसल्याने अगोदरच रब्बीचे क्षेत्र घटले आहे. आहे त्या िपकांवरही किडीच्या प्रादुर्भावाची शक्यता असून, हरभरा पिकावर घाटेअळीचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकर्यांनी आतापासूनच व्यवस्थापन करण्याची नितांत गरज आहे. विदर्भातील शेतकरी रब्बी हंगामात प्रामुख्याने हरभरा, गहू पिके घेतात; परंतु यावर्षी पाऊस नसल्याने कोरडवाहू क्षेत्रात रब्बीचा पेरा घटला आहे. पावसाच्या प्रतीक्षेत या शेतकर्यांनी हरभरा पेरणी उशिरा केली. त्याचा पिकावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. आता झाडांची उंची वाढावी व चांगले उत्पादन मिळावे, याकरिता शेतकरी कीटकनाशकासोबतच टॉनिक रसायनाचा प्रयोग करीत आहेत.*एकात्मिक व्यवस्थापन आवश्यकअनावश्यक रासायनिक कीटकनाशकांचा वापर टाळावा, घाटेअळीच्या नियंत्रणासाठी तिचे नैसर्गिक शत्रू कीटक क्रायसोपा, लेडीबर्ड बिटल व रेव्हयव्हीड ढेकूण आहेत. या कीटकांचा बचाव करण्यासाठी रासायनिक कीटकनाशकांचा वापर कमी करावा. या घाटेअळीचे परभक्षक बगळे, मैना, नीळकंठ, काळी चिमणी, कीटक असतात. हे पक्षी घाटेअळीचे नियंत्रण करतात. यासाठी शेतात प्रतिहेक्टरी २0 पक्षी थांबे उभे करावे, असा सल्ला कृषी विद्या पीठाने दिला आहे.
हरभ-यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव!
By admin | Updated: November 9, 2014 23:48 IST