शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महागाईने तेल ओतले; घरातील बजेट बिघडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:41 IST

गत काही दिवसांपूर्वीच घरगुती गॅसमध्येही भरमसाट मोठी दरवाढ झाली आहे. तसेच शेतीच्या मशागतीच्या जरा बरोबरच रासायनिक खताच्या दरातही भरमसाट ...

गत काही दिवसांपूर्वीच घरगुती गॅसमध्येही भरमसाट मोठी दरवाढ झाली आहे. तसेच शेतीच्या मशागतीच्या जरा बरोबरच रासायनिक खताच्या दरातही भरमसाट वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक महागाईचा सामना करित आहेत. खाद्यतेलाच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य गृहिणी त्रस्त झाले आहेत. जानेवारी ते सप्टेंबर महिन्याच्या दरम्यान ५० ते ८० रुपयांनी खाद्यतेलाच्या दरात वाढ झाली आहे. खाद्यतेलाबरोबरच डाळी, कडधान्याचे दरही कडाडले आहेत. वाढत्या महागाईने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट बिघडले आहे.

अशी वाढली महागाई

शेगदाणा तेल १५५ -१७५

सोयाबीन तेल ११८- १६०

शेगदाणे १००- ११५

साखर ३८- ४०

साबुदाणा ५९- ७०

मसाले ८००- १०००

चहापूड २३०- २७०

तूरडाळ ९०- १००

मूगडाळ ९०- ११५

उडीद डाळ १००- १००

हरभरा डाळ ७५ -८५

सिलिंडर पोहोचले हजाराच्या घरात

गत काही दिवसांत घरगुती गॅस सिलिंडरचे दर वाढले आहेत. आता ग्राहकांना गॅस सिलिंडर प्रति ९०५ रुपयांमध्ये मिळत आहे. त्यामध्ये घरी आणण्याचा खर्च जोडल्यास संपूर्ण खर्च हा हजाराच्या घरात जात आहे. डाळीचे दर कडाडले असून, सर्वसामान्यांना न परवडणारे आहेत. त्यामुळे काही जणांनी जेवणातून डाळ गायब केल्याचे दिसून येत आहे.

तीन ते पाच सदस्यांच्या कुटुंबाचा वाढलेला महिन्याचा खर्च असा

खाद्य तेल १०० रुपये

धान्य ५०

शेगदाणे ३०

साखर १२

साबुदाणा ३०

मसाले ५०

चहापूड १०

तूरडाळ ३०

मूगडाळ ६०

उडीद डाळ १०

हरभरा डाळ ३०

पेट्रोल १५०

डिझेल १००

एकूण ६६०