शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

तूर नोंदणी, टोकनसाठी चिखली बाजार समितीत स्वतंत्र कक्ष

By admin | Updated: May 20, 2017 00:22 IST

चिखली: चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी तूर नोंदणी व टोकणसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली: सरकारने तूर खरेदीसाठी ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली आहे; मात्र पावसाचा फटका बसून यार्डातील तुरीचे नुकसान होऊ नये यासाठी पूर्व नियोजन म्हणून चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीने शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी तूर नोंदणी व टोकणसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन बाजार समितीचे सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी यांनी केले आहे.चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीच्यो १३ काट्यांवर २२ एप्रिल पर्यंत आलेल्या सर्व तुरीची खरेदी जवळपास आटोपली आहे. दरम्यान, सरकारने तूर खरेदीस ३१ मेपर्यंत मुदतवाढ दिली असल्याने या मुदतवाढीचा फायदा शेतकऱ्यांना व्हावा तसेच तुरीला मोसमी पावसाचा फटका बसून नुकसान होऊ नये यासाठी पूर्व नियोजन म्हणून बाजार समितीने तूर नोंदणी व टोकणसाठी स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे. शेतकऱ्यांनी या सुविधेचा लाभ घेण्यासाठी आपल्या नावाची नोंदणी मुख्य कार्यालयात करावी, नोंदणीनुसार यार्डवर प्रथम येणाऱ्या शेतकऱ्यांस टोकन देण्यात येऊन तुरीचे मोजमाप केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय टळणार आहे. या केंद्रावर आतापर्यंत २ हजार १०० शेतकऱ्यांनी नोंद केली असून, आणखी ४० हजार क्विंटलची आवक अपेक्षित असल्याने अतिरिक्त वजनकाटे वाढविण्यात आले आहेत. बारदाना उपलब्ध झाल्यास दररोज १५०० क्विंटलपेक्षा जास्त वजनमाप होणार आहे व त्यानुसार शेतकऱ्यांना समितीकडून फोनद्वारे कळविण्यात येणार आहे. तसेच यार्डातील सूचना फलकावरही संभाव्य यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर बाजार हस्तक्षेप योजना सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तहसीलदार मनीष गायकवाड, सचिव संदीप रुद्राक्ष, बाजार समितीचे सचिव अजय मिरकड या त्रिसदस्यीय समितीचीही देखरेख राहणार असल्याने या सुविधेचा तालुक्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती डॉ. भुसारी यांनी केले आहे. तुरीची तातडीने खरेदी करा : स्वाभिमानी संघटनाशासनाने तूर खरेदीस ३१ मे पर्यंत मुदतवाढ दिल्यानंतर शेतकऱ्यांकडील ४० हजार क्विंटल तुरीची नोंद बाजार समितीकडे झालेली आहे; मात्र असे असताना चिखली केंद्रावर तूर खरेदी बंद असल्याने नोंद झालेल्या शेतकऱ्यांची तूर तत्काळ खरेदी करण्यात यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विनायक सरनाईक यांनी सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तहसीलदार मनीष गायकवाड यांच्याकडे १९ रोजी केली आहे. यावेळी बाजार समितीचे सचिव मिरकड, सभापती डॉ. सत्येंद्र भुसारी, सहायक निबंधक रूद्राक्ष, स्वाभिमानीचे दीपक सुरडकर, भारत वाघमारे, भरत जोगदंडे आदी उपस्थित होते.