शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

नदी पात्रात वाढले अतिक्रमण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2017 01:40 IST

हनुमान जगताप।लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शासनाच्यावतीने धोक्याचे क्षेत्र घोषित केले असताना, मलकापुरातील नळगंगा नदीच्या पात्रात मागील काही वर्षांत अतिक्रमित घरांची संख्या लक्षवेधी स्वरूपात वाढली आहे. अशात नदीला पूर आल्यास मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा हवामान खात्याने ज्यादा पावसाची शक्यता वर्तविल्याने नदीपात्रातील ‘त्या’ तीनशेवर कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर ...

ठळक मुद्देनळगंगेला पूर आल्यास पात्रातील अतिक्रमकांना धोका

हनुमान जगताप।लोकमत न्यूज नेटवर्कमलकापूर : शासनाच्यावतीने धोक्याचे क्षेत्र घोषित केले असताना, मलकापुरातील नळगंगा नदीच्या पात्रात मागील काही वर्षांत अतिक्रमित घरांची संख्या लक्षवेधी स्वरूपात वाढली आहे. अशात नदीला पूर आल्यास मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर यंदा हवामान खात्याने ज्यादा पावसाची शक्यता वर्तविल्याने नदीपात्रातील ‘त्या’ तीनशेवर कुटुंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होताना दिसते.यासंदर्भात अधिक माहिती अशी, की शहराच्या पूर्वभागातून नळगंगा नदी वाहते. महापुरामुळे नदीकाठच्या घरांना संकटाचा सामना करावा लागू नये, याकरिता शासनाच्यावतीने नदीपात्रास धोक्याचे क्षेत्र घोषित केल्याची माहिती आहे. असे असताना मागील काही वर्षात नळगंगा मायीच्या पात्रात दोन्ही बाजूंनी अतिक्रमित घरांची संख्या लक्षवेधी स्वरूपात वाढल्याची परिस्थिती आहे.शहरात प्रामुख्याने गाडेगाव, जावईनगर, सालीपुरा, धनगरपुरा, सुभाषचंद्र बोस नगर, पारपेठ, मोहनपुरा, म्हाडा कॉलनी या भागात नदी पात्रातच अनेकांनी अतिक्रमण करून घरे थाटली आहेत, तर काही नागरिकांनी व्यावसायिक दुकाने देखील त्यात थाटली आहेत. एकंदरित त्या घरांची संख्या सुमारे तीनशेवर असल्याची माहिती असून, तेवढीच कुटुंब त्यातून वास्तव्य करताना दिसतात. अशा परिस्थितीत बुलडाणा घाट, मोताळा व मलकापूर तालुक्यात मुसळधार पाऊस झाल्यास नळगंगेला महापूर येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास नदीपात्रातील त्या घरांची पर्यायाने वास्तव्य करणाºया कुटुंबातील नागरिकांची मोठ्या प्रकारची जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे असताना प्रशासनाचे त्याकडे साफ दुर्लक्ष होताना दिसत आहे.दरवर्षी शासनाच्यावतीने संबंधित विभागामार्फत नळगंगा मायीच्या पात्रातील अतिक्रमिकांना सूचना देण्यात येतात. मात्र, कारवाई केल्या जात नाही, हे वास्तव आहे. अशा परिस्थितीत नदीपात्रातील वास्तव्य त्या कुटुंबांच्या अंगाशी येऊ शकते. ही बाब गंभीर असताना नागरिकांकरवी प्रामुख्याने शासनाच्यावतीने त्याकडे दुर्लक्ष होताना दिसते.