-----------
मेंढपाळाच्या समस्या सोडविण्याचे आवाहन
बुलडाणा : तालुक्यातील मेंढपाळाच्या समस्या सोडविण्याचे आवाहन धनगर क्रांती संघटनेचे विठ्ठल हटकर यांनी केले आहे. धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर बुलडाणा दौऱ्यावर आल्यानंतर त्यांच्याशी चर्चा करण्यात आली.
---------
भगवान बाबा यांना अभिवादन
मोताळा : तालुक्यातील सारोळा येथे संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी मान्यवरांनी भगवान बाबा यांना अभिवादन केले. बी. जी. ताठे यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
सीसीआय कापूस विक्रीकडे शेतकऱ्यांची पाठ
बुलडाणा : खुल्या बाजारपेठेत कापसाची दरवाढ झाली असताना, सीसीआयने कापसाच्या दरात घसरण केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जिल्ह्यातील सीसीआयच्या कापूस खरेदी केंद्राकडे पाठ फिरविल्याचे दिसून येते.
--------
राष्ट्रीय मतदार दिन साजरा
मेहकर : येथील सिंधूताई जाधव कला व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला. यावेळी राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. आर.जी.सुरळकर, डॉ. जुनघरे, प्राचार्य डॉ. लाहोरकर यांनी मार्गदर्शन केले.
--------
नेमाडेंवर कारवाई करा
बुलडाणा : बंजारा समाजाबद्दल अपशब्द वापरणाऱ्या साहित्यिक भालचंद्र नेमाडेवर कारवाई करण्याची मागणी अखिल भारतीय बंजारा सेनेचे इंदरसिंह राठोड यांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिऱ्यांना सोमवारी निवेदन सादर करण्यात आले.
-
रस्ता सुरक्षा जनजागृती कार्यक्रमाला प्रतिसाद
मोताळा : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने आयोजित रस्ता सुरक्षा सप्ताहाला मोताळा येथे नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी पोलीस प्रशासनाकडून पथनाट्य सादर करण्यात आले.
--------
मुक्ताई मंदिरात विविध कार्यक्रम
बुलडाणा : एकादशीला बुलडाणा-खामगावरोडवरील पाळा येथील मुक्ताई मंदिरात विविध पूजा अर्चा करण्यात आली. यावेळी शांताराम महाराज पाळेकर यांनी मार्गदर्शन केले.
----
जिल्ह्यातील कामगारांसाठी लढा उभारणार
बुलडाणा : बांधकाम कामगारांच्या अडीअडचणी सोडविण्याचा निर्धार बांधकाम कामगार मजूर संघाच्या वतीने करण्यात आला. यावेळी प्रशांत मेश्राम, बाबूराव सरदार यांनी बांधकाम कामगारांना मार्गदर्शन केले.
------------
पल्स पोलिओ लसीकरणाला प्रतिसाद
मोताळा : तालुक्यातील शेलापूर येथे रविवारी पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी आशा सेविका यांनी घरोघरी सर्वेक्षण करीत पल्स पोलिओ १०० टक्के मोहीम राबविली.
----