शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

वादळी पावसाने केळी बागांचे नुकसान!

By admin | Updated: June 17, 2017 00:18 IST

केळी उत्पादक अडचणीत: आधी उन्हाचा, आता वादळी पावसाचा फटका

हिवराआश्रम : केळी उत्पादकांना या उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतेचा फटका बसला. उन्हाचे प्रमाण जास्त व पाणी कमी पडल्याने केळीचे उत्पादन घटले; त्यात केळीला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे यावर्षी केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले, तर आता पावसाळ्यात अनेक ठिकाणी वादळ- पावसामुळे फडाने भरलेली केळीची झाडेच भुईसपाट होत असल्याचे दिसून येत आहे.पश्चिम वऱ्हाडातील शेतकरी आधुनिक शेतीची कास धरत फळबाग घेण्याकडे वळले आहेत. त्यात केळी या फळबागेकडे सर्वाधिक शेतकऱ्यांचा कल आहे. बुलडाणा, वाशिम व अकोला या तीनही जिल्ह्यामध्ये सिंचनाची सुविधा असलेल्या अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड केलेली आहे; परंतु आता केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.उन्हाळ्यात यावर्षी जास्त उन तापल्याने केळीच्या फडांना याचा सर्वाधिक फटका बसला. केळीला उन्हाळ्यात जास्त पाणी लागते; परंतु यावर्षी पाणी कमी पडल्याने उत्पादनातही घट आली. आता पावसाळ्यातही केळी फळबागेचे सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान होत आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी सोसाट्याच्या वाऱ्यामुळे केळीची झाडे भुईसपाट झाली आहेत. केळीला लागलेल्या घडाचेही यामुळे नुकसान झाले आहे. परिणामी, यावर्षी केळी उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मोडलेल्या झाडांना लाकडाचा आधारसोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने अनेक ठिकाणी केळीची झाडे पडलेली आहेत. त्यामुळे या पडलेल्या केळीच्या झाडांना लाकडाचा आधार देऊन उभे करण्याचे काम सध्या केळी उत्पादक शेतकरी करत आहेत. यामध्ये केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लाकडाच्या आधारावर केळीची झाडे सोसाट्याच्या वाऱ्यासमोर किती वेळ तग धरतात, याची शाश्वती नसल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहे. शासनाने सर्वेक्षण करून भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.