शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:35 IST

बुलडाणा : जागतिक जलदिन २२ मार्च निमित्त १६ ते २२ मार्च २०२१ या कालावधीत जिल्हयात जलजागृती सप्ताहचे उदघाटन ...

बुलडाणा : जागतिक जलदिन २२ मार्च निमित्त १६ ते २२ मार्च २०२१ या कालावधीत जिल्हयात जलजागृती सप्ताहचे उदघाटन बुलडाणा पाटबंधारे प्रकल्प मंडळाचे अधीक्षक अभियंता नितीन सुपेकर यांचे हस्ते मोजक्या लोकांच्या उपस्थितीत कोविड-१९ नियमांचे पालन करून करण्यात आले. गतवर्षीच्या तुलनेत सिंचनात १० टक्के वाढ करणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनप्रबोधन करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे.

अधीक्षक अभियंता यांचे दालनात झालेल्या कार्यक्रमात जिल्हयातील खडकपुर्णा, पैनगंगा, वान, मन, नळगंगा, पुर्णा, ज्ञानगंगा, विश्वगंगा या प्रमुख नद्यांचे जलपुजन करण्यात आले. कार्यक्रमप्रसंगी नितिन सुपेकर यांनी उपस्थितांना जलप्रतिज्ञा वाचन करुन पाणीबचतीचे महत्व जनतेस पटवुन देण्याचे आवाहन केले. या सप्ताहा दरम्यान १७ ते २१ मार्च या कालावधीत जलजागृती सप्ताह साजरा करतांना स्थानिक प्रशासनाच्या निर्देशानुसार कोव्हीड प्रादुर्भावाच्या लागु असलेल्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करावे, नियमांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्याच्या आवाहन अधिक्षक अभियंता नितीन सुपेकर यांनी केले. जलजागृती सप्ताहात पाणीबचती विषयी जनजागृती करणे, विभागाच्या वाहनांवर पोष्टर्स लावणे, पाणीबचती विषयी मान्यवर वक्त्यांचे प्रबोधनपर सेमिनार आयोजित करणे, मान्यवरांच्या पाणी बचत, पाणी वापर संस्था व कालवा स्वच्छता ईत्यादी विषयावर यशोगाथा आयोजित करणे. सोशल मिडीयावर पाणी बचती विषयी जनजागृती करणे अशाप्रकारे जास्तीत जास्त ऑनलाइन स्वरुपात साजरा करण्याचे निर्देश देण्यात आलेत.

यावेळी प्रमुख उपस्थितीत पेनटाकळी पाणी वापर संस्थांच्या महासंघाचे अध्यक्ष राजेंद्र गाडेकर यांनी पाणीवापर संस्था व जलसंपदा विभाग यांच्या समन्वयाने केल्या जाणाऱ्या प्रयत्नांचे महत्व विषद करुन, पाणी ही काळाची गरज असुन, पाणी बचत करणे आवश्यक असल्याचे सांगीतले. उपकार्यकारी अभियंता क्षितीजा गायकवाड यांनी याप्रसंगी गृहीणींनी दैनंदिन काम काजासाठी आवश्यक पाण्याचा वापर काटकसरीने करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. कार्यक्रमासाठी सहा.अधिक्षक अभियंता तुषार मेतकर, शाखा अभियंता अनिल खानजोडे, सहा.अधिक्षक अभियंता अंकुश गावित, लघुलेखक भरत राऊत, करण उमाळे, नितीन डब्बे, शत्रुघ्न धोरण, शेख ग्यासुद्दीन आदींनी प्रयत्न केले. संचालन व आभार प्रदर्शन मनजीतसिंग राजपुत यांनी मानले. या कार्यक्रमासाठी जलसंपदा विभागातील अधिकारी , कर्मचारी उपस्थित होते.