शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

(सुधारीत) सामाजिक भवनातील अतिक्रमणामुळे सरपंच निवडीचा पेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:36 IST

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर लोणार तालुक्यातही ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या तेथील सरपंच निवडीसाठी १० फेब्रुवारी रोजी खेळगाव येथे ही ...

नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर लोणार तालुक्यातही ज्या ठिकाणी निवडणुका झाल्या तेथील सरपंच निवडीसाठी १० फेब्रुवारी रोजी खेळगाव येथे ही त्यानुषंगाने सभा बोलावण्यात आली होती. मात्र थेट समाज भवनातच एकाने अतिक्रमण केलेले असल्याने ही नियोजित सभाच तहसील प्रशासनास एक दिवस पुढे ढकलावी लागली आहे.

खळेगाव ग्रामपंचायतीची सदस्य संख्या नऊ आहे. या नऊ सदस्यांतून सरपंच निवडीसाठी १० फेब्रुवारी रोजी सभा आयोजित करण्यात आली असल्याची नोटीस ६ फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित सदस्यांना पाठविण्यात आली होती. ही सभा खेळगावातील समाज भवनात घेण्यात येणार असल्याचे संबंधित नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले होते. त्यानुषंगाने नवनिर्वाचित सदस्य, अध्यासी अधिकारी तथा मंडळ अधिकारी व्ही.पी. नागरे, तलाठी, ग्रामसेवक व पोलीस खेळगावात हजर झाले. मात्र समाज भवनामध्ये अतिक्रमण करून एकाने घर थाटल्याचे समोर आले. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेची एकच तारांबळ उडाली होती. या संपूर्ण प्रकारामुळे संबंधित सरपंच निवडीची सभा ही निर्धारित स्थळी घेणे प्रशासनास शक्य नव्हते. दरम्यान, येथील कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती पाहता नायब तहसीलदार विजय पिंपरकर हेही खळेगाव येथे पोहोचले. मात्र निर्धारित स्थळी सभा घेणे अतिक्रमणाच्या परिस्थितीमुळे शक्य नव्हते. आता ही सभा ११ फेब्रुवारी रोजी खळेगावामधील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये घेण्यात येत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.

--कोट--

ग्रामपंचायत भवनामध्ये अतिक्रमण करणाऱ्यांना वेळोवेळी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. मात्र संबंधितांनी त्या स्वीकारल्या नाही. यामुळे सरपंच निवडणूक नियोजित जागेअभावी रद्द करण्यात आली.

नंदकिशोर तेजनकर, सचिव, ग्रामपंचायत, खळेगाव

--कोट--

समाज भवनामध्ये ही सभा घेण्यात येणार असल्याचे आधीच ग्रामसेवकास स्पष्ट करण्यात आले होते. मात्र त्यांनी संबंधित प्रकाराबाबत कल्पना दिली नाही. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली. आता तहकूब झालेली सभा ११ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषदेच्या शाळेत घेण्यात येईल.

सैफन नदाफ

तहसिलदार, लोणार