शहरं
Join us  
Trending Stories
1
अचानक राजीनामा दिल्यानंतर, काय करतायत जगदीप धनखड? पत्नी वारंवार का जात आहे राजस्थानला?
2
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
3
"खू्प कर्ज झालंय..."; सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय?
4
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
5
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
6
R Ashwin: आर. अश्विन आयपीएलमधून निवृत्त, फक्त विदेशी क्रिकेट लीगमध्ये खेळणार!
7
ऑनलाईन App वरुन ऑर्डर केलं जेवण अन् डिलिव्हरी बॉयच्याच पडली प्रेमात, आता केलं लग्न
8
अष्टविनायक चित्रपटातील साधीभोळी गणेशभक्त वीणा आता दिसते अशी, अनेक वर्षे होती चित्रपटांपासून दूर
9
"सूनेने गोळी मारून हत्या केली, माझा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला होता"; तीन महिन्यातच पतीची हत्या
10
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
11
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
12
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
13
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
14
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
15
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
16
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
17
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
18
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
19
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
20
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता

'ऑफर'च्या नावाखाली महत्त्वपूर्ण डेटा जातोय चोरीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 12:36 IST

Cyber Crime : विविध प्रकारच्या ऑफर्सच्या नावाखाली सोशल मीडियाच्या माध्यमातून लिंक पाठवली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  कोरोनालोकांची माहिती गोळा करण्यासाठी हॅकर्स नवनवीन युक्ती वापरत आहेत. अशाचप्रकारे गेल्या अनेक दिवसांपासून विविध प्रकारच्या ऑफर्सच्या नावाखाली सोशल मीडियाच्या माध्यमातून लिंक पाठवली जात आहे. या लिंकच्या माध्यमातून मोबाईलमधील प्रायव्हेट डाटा चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.काही दिवसांपासून फ्री मुव्हीज, आयपीएल ऑफर, काही नामवंत चॅनलचे दोन महिन्यांसाठी मोफत सबस्क्रिप्शन आदी विविध ऑफरच्या नावाने अनेकांच्या मोबाईलवर लिंक पाठवली जात आहे. या लिंकला क्लिक करताच एक अप्लिकेशन डाऊनलोड होते. अप्लिकेशन डाउनलोड होताच आपल्या व्हॉट्सॲपच्या मदतीने आपण ज्या ग्रुपमध्ये असतो आणि आपल्याकडे ज्या व्यक्तींचे नंबर असतात, त्या सर्वांना या अप्लिकेशनची लिंक आपोआप जाते. ही साखळी अशीच सुरू राहते. या अप्लिकेशनच्या माध्यमातून आपल्या मोबाईलचा डेटा चोरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे स्मार्टफोन वापरकर्त्यांनी सजग राहणे गरजेचे आहे. सध्या सायबर पोलिसांकडे अशाप्रकारे कुठल्याही व्यक्तीची तक्रार आलेली नाही. 

अशा पद्धतीने ॲप अनइन्स्टॉल करा!  मोबाईलच्या सेटिंगमध्ये जावून ॲप सेटिंगमध्ये जा. तेथे प्रोफाईल लिस्ट नावाने हे ॲप असेल. या ॲपच्या पुढे डॉट एक्सवायझेड, असे असू शकते. या ॲपला क्लिक केल्यानंतर फोर्स टू स्टॉप आणि क्लियर कॅच करावे. त्यानंतर मोबाईल बंद करून चालू करावा. तरच हे अप्लिकेशन मोबाईलमधून जाते. अन्यथा काही मिनिटांनी ॲपच्या मदतीने मेसेज पुढे फॉरवर्ड होतात.

इंटरनेट वापरकर्त्याचे अनुभव  एका ग्रुपवर एकाने ही लिंक टाकली होती. ही लिंक ओपन केल्यानंतर ऑनलाईन स्टीम नावाचे अप्लिकेशन डाऊनलोड झाले. यानंतर ऑफरबाबतचा मेसेज आणि लिंक आपोआप माझ्या मोबाईलमधील सर्व ग्रुपवर आणि पर्सनल नंबरवर गेली. अप्लिकेशन डाऊनलोड होताच दोन-तीन मिनिटांसाठी माझा मोबाईल हँग झाला. अप्लिकेशन डिलीट केल्यानंतरही मोबाईल हँग होणे किंवा दुसऱ्यांना मेसेज आपोआप जाण्याची अडचणी येत होती. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमkhamgaonखामगाव