बुलडाणा : युती आणि आघाडीच्या घटस्फोटानंतर यामध्ये सहभागी असलेल्या पक्षांचा उमेदवारांचा शोध घेण्याची वेळ आली आहे. एकमेकांवर कुरघोडी करण्यासाठी तोडीसतोड उमेदवार देण्याकरता व्यूहरचना केली जात असून, इतर पक्षातील नाराज नेत्यांना गळाला लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस व भाजपा या दोन पक्षांना उमेदवार शोधण्यासाठी कसरत करावी लागत असून, इतर पक्षातील आयात उमेदवारांवर त्यांची भिस्त आहे. आज रात्री उशिरापर्यंत या दोन्ही पक्षा तील उमेदवार ठरतील व हे उमेदवार मतदारसंघात नवे राजकीय धक्के देण्याची शक्यता वर्तविली जात आहे.आज दिवसभर जिल्ह्यात अफवांचा बाजार चांगलाच गरम होता. भाजपाने आतापर्यंत निवडणूक न लढविलेल्या मतदारसंघासाठी उमेदवार शोधत असून, सिंदखेडराजा किंवा बुलडाणा मतदारसंघासाठी राष्ट्रवादीतील एका दिग्गज नेत्याच्या नावाची चर्चा जोरात होती. या चर्चेमुळे भाजपाच्या गोटातही खळबळ उडाली आहे. रात्री उशिरापर्यंत याबाबत कुठेही पुष्टी करण्यात आली नाही. मेहकर म तदारसंघातही भाजपाला उमेदवाराचा युद्ध पातळीवर शोध सुरू आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उमेदवारांची आयात केली जाणार असल्याचे संकेत आहेत. बुलडाणा, चि खली, मलकापूर या मतदारसंघासाठी प्रामुख्याने मोठे नेत्यांच्या संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस आहे. रात्री उशिरापर्यंत राष्ट्रवादीची यादी बाहेर आली नव्हती व त्या नेत्यांनाही काही निरोप न आल्यामुळे कार्यकर्त्यांची घालमेल वाढली आहे.शिवसेना खामगाव व जळगावमध्ये उमेदवारांची चाचपणी करीत असून, या दोन्ही ठिकाणी उमेदवार आयात करण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. खामगावात भाजपा व सेना विशेषत: भाऊसाहेब फुंडकर यांच्यासोबत सेना नेत्यांचा असलेला घरोबा पाहता सेनेकडून उमेदवार कोण, याची प्रचंड उत्सुकता मतदारसंघात लागुन आहे.चिखली मतदारसंघात भाजपाच निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट झाल्याने भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला दुसरा मार्ग शोधावा लागणार आहे. येथे सेनेच्यावतीने डॉ.प्र तापसिंग राजपूत व जालींधर बुधवत यांनी अर्ज दाखल केला असून, यांच्यापैकी कुणाला अधिकृत उमेदवारी घोषित होते, यावरच जातीय समीकरणांचे राजकारण तापणार आहे. सिंदखेडराजा म तदारसंघात आज राष्ट्रवादीकडून रेखाताई खेडेकर यांनी अर्ज दाखल केला असला तरी राष्ट्रवादीचे नेते आ.डॉ.राजेंद्र शिंगणो यांची अर्ज भरण्यावेळी असलेली अनुपस्थिती राजकीय क्षेत्रात चर्चेची झाली आहे. या सर्व मतदारसंघामध्ये आज अफवा फिरत होत्या. रात्री उशिरापर्यंत भाजपा, सेना व राष्ट्रवादीची यादी उमेदवार जाहीर झाल्यावरच मतदारसंघातील धक्क्यांची तीव्रता स्पष्ट होणार आहे.
‘आयात’ उमेदवारांना लागणार लॉटरी
By admin | Updated: September 27, 2014 00:17 IST