शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

देऊळगाव राजात कडक निर्बंधांची अंमलबजावणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:35 IST

देऊळगाव राजा : काेराेना संक्रमण वाढत असल्याने प्रशासनाच्या वतीने १० मेच्या रात्री ८ वाजेपासून कडक निर्बंध लावण्यात ...

देऊळगाव राजा : काेराेना संक्रमण वाढत असल्याने प्रशासनाच्या वतीने १० मेच्या रात्री ८ वाजेपासून कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. देऊळगाव राजा शहर आणि तालुक्यात या निर्बंधांची अंमलबजावणी करण्यात आली. तसेच सायंकाळी ५ वाजेपर्यंत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

जिल्ह्यात वाढता काेराेनाचा प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी यांनी १० मेच्या रात्री आठ वाजेपासून कडक निर्बंध लावले आहेत. त्यानुसार महसूल, पोलीस तसेच नगरपालिकेच्या पथकाकडून उल्लंघन करणाऱ्यांवर कार्यवाही सुरुवात करण्यात आली. मंगळवारी सकाळी दवाखान्याच्या नावाखाली बाहेर पडणाऱ्या नागरिकांना समज देऊन परत पाठवले. यामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांचा माेठ्या प्रमाणात समावेश हाेता. काही तरुण विनाकारण दुचाकीने फिरताना आढळले. त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. काही दुकानदार अर्धे शटर उघडून साहित्य विकताना आढळले. त्यांच्यावरही दंडात्मक कारवाई करण्यात आली. ११ मेच्या पाच वाजेपर्यंत तीस हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. बुलडाणा-जालना सीमेवर आज आरोग्य विभागामार्फत कोरोना संसर्गासंदर्भात रॅपिड टेस्ट सुद्धा करण्यात आल्या; परंतु यामध्ये कोणीही पॉझिटिव्ह आढळले नसल्याचे आरोग्य कर्मचाऱ्यांनी सांगितले. तसेच सीमेवर वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. यामध्ये काही कारण नसताना जिल्ह्यांमध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनधारकांना परत पाठवण्यात आले. यावेळी पोलीस पथक प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक प्रमोद भातनाखेंसह आर. जी. दांडगे, संजय चवरे इतर पोलीस कर्मचारी सहभागी झाले हाेते. महसूलच्या पथकामध्ये सारिका भगत यांच्या नेतृत्वात एस. राणे. नायब तहसीलदार आर. एन. तागवाले, तलाठी एम. के. झिने कर्मचारी उपस्थित होते. नगरपालिका पथकामध्ये पथक प्रमुख सी. पी. तायडे, राजेंद्र गोरे, राजेश अग्रवाल, मनोज अग्रवाल इत्यादी कर्मचारी उपस्थित होते.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडून दंडात्मक कारवाईला सामोरे जाऊ नये. बँक सध्या बंद असल्यामुळे घरातूनच ऑनलाइन व्यवहार करावा. अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडावे. दवाखान्याच्या नावाखाली नागरिकांनी बाहेर पडू नये. ग्रामीण भागातील नागरिकांनी सुद्धा शहराकडे येणे टाळावे.

-प्रमोद भातनाखे, साहायक पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन देऊळगाव राजा