शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेतीच्या अवैध वाहतुकीने तीन वर्षात घेतले ११ बळी, ग्रामस्थांचा मराठवाड्याच्या सीमेवर रस्ता रोको

By निलेश जोशी | Updated: March 14, 2024 14:59 IST

अजिसपूर येथील एकाचा गुरूवारी अपघाता झाला मृत्यू: वाहनाचा शोध सुरू

लोणार: विदर्भ-मराठवाड्या्च्या सिमेवर लोणार तालुक्यातील अजिसपूर फाट्यावर गुरूवारी सकाळी ग्रामपंचायत ऑपरेटचा रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने मृत्यू झाला. त्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी अजिसपूर फाट्यावर रास्ता रोको केला.

गुरूवारी सकाळी शेक सिराज शेख अयूब हे एमएच-१७-बीसी-९२१० क्रमांकाच्या दुचाकीने अजिसपूर येथून लोणारकडे जात होते. त्यावेळी रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. त्यात शेख अयूब गंभीर जखमी झाले. ग्रामस्थांनी शेख सिराज यांना मेहकर येथील खासगी रुग्णालयात उपचारसाठी दाखल केेल. तेथे प्रथमोपचार करून त्यांना जालना येथे हलविण्यात आले असता रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. प्रकरणी ज्या वाहनाने हा अपघात केला. त्या वाहनावर कारवाई करण्यासाठी ग्रामस्थांनी तळणी-लोणार मार्गावर अजिसपूर फाट्यावर टायर जाळून रास्ता रोको केला.नातेवाईक रस्त्यावरमराठवाड्यातील पुर्णा नदीपात्रातून रात्रंदिवस वाळूचा उपसा करून लोणामार्गे विदर्भात सर्वदूर रेतीची अवैध वाहतूक होते. क्रमांक नसले्लया वाहनातून ती होत असून आरटीअेांचेही याकडे दुर्लक्ष आहे. लोणार तहसिल प्रशासन व पोलिस प्रशासनावर मृतकाच्या नातेवाईकांनी या प्रश्नी अर्थपूर्ण संबंध असल्याचा आरोप करत रास्ता रोको केला आहे. मंठा तहसिलकडून रेतीच्या अवैध वाहतूकप्रकरणीकार कारवाई होते. परंतू लोणार तहसिल व लोणार पोलिसांकडून ती का? होत नाही, असा प्रश्न संतप्त नातेवाईक शेख अतिक शेख चाँद, शेख रसीद शेख दस्तगीर, शेख यासीन शेख कासम, शेख मुहमद रफीक यांच्यासह अनेकांनी केली.चार महिन्यात पाच बळीगत तीन वर्षात रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनामुळे विदर्भाच्या हद्दीत सात तर मराठवाड्याच्या हद्दीत चार जणांचा बळी घेतला आहे. २०२४ मध्ये आतापर्यंत विदर्भात एक तर मराठवाड्याच चार जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. १५ दिवसापूर्वीच तळणी येथील एका शेतकऱ्याचा अपघातामध्ये अशा पद्धतीने मृत्यू झाला होता