शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक

By admin | Updated: October 2, 2014 23:57 IST

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल : २ लाख रुपयांचा माल जप्त.

मेहकर (बुलडाणा) : घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक जोमात सुरू आहे. डोणगाव रोडवरील स्थानिक क्रीडा संकुलाजवळ नुकतेच घरगुती गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक करणारे वाहन पकडले असून, त्यामध्ये २ लाख २0 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. घरगुती गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच एएसआय दीपक साळवे यांनी डोणगाव मार्गावरील क्रीडा संकुलजवळ नाकाबंदी केली. दरम्यान, विना परवाना घरगुती वापराचे दहा गॅस सिलिंडरची वाहतूक करणारी एम.एच.३0 ए.४२५५ क्रमांकाची ओमनी कार पकडली. त्यामध्ये मेहकर येथील विनोद हरिभाऊ महाले (३0) व संतोष आनंदराव साने (४५) यांच्या ताब्यातील गॅस सिलिंडरसह ओमनी कार असा २ लाख २0 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. दोन्ही आरोपींना मेहकर पोलिसांनी अटक केली आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे तालुक्यात घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक दिवसेंदिवस वाढतच आहे. त्याचबरोबर शहरातील हॉटेल्समध्येसुद्धा घरगुती सिलिंडरचा सर्रास वापर होत आहे. यावर प्रशासन कारवाई करण्यास धजत नसल्याने घरगुती गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक व हॉटेल्समध्ये वापर करणे सोपे झाले आहे. कुठे घरगुती गॅस सिलिंडरची अवैध वाहतूक आढळून आली, तर प्रकरण ति थेच निपटविण्याच्या नादात काही शिलेदार व्यस्त असल्याचेही आढळून येते. प्रकरणाच्या तडजोडीमध्ये कारवाई करण्यासही विलंब होत असल्याचा प्रकार येथे पाहावयास मिळत आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.