शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
6
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
7
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
8
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
9
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
10
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
11
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
12
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
13
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
14
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
15
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
16
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
17
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
18
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
19
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
20
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

सिंदखेडराजा येथे सागवनाची अवैध कत्तल

By admin | Updated: August 13, 2014 23:35 IST

सिंदखेडराजा वनविभागात वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे.

सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यात किमान ५00 हेक्टर परिसरात आजही वन विभागाची जंगले असून, त्या भागात सागवनसह इतर मोठी वृक्ष अस्तित्वात आहेत; मात्र या वृक्षांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे. वन विभागाच्या दुर्लक्षीतपणामुळे ती जंगले नष्ट होत असून, त्यावर तत्काळ पायबंद घालण्याची गरज आहे.तालुक्यात हनवतखेड, सिंदखेडराजा आडगावराजा, सोनुशी, भोसा, दुसरबीड या भागात वन विभागाची जमीन असून, ५00 हेक्टरवर सागवन, पिंपळ, निंब या शेकडो प्रकारची वृक्ष मोठय़ा प्रमाणात आहे. वन विभागांतर्गत येणार्‍या जंगलात वन विभागाचे लक्ष नसल्याने मोठय़ा प्रमाणात सागवानसह इतर वृक्षांची मोठय़ा प्रमाणात कत्तल होत असून, ते परस्पर विकल्या जात आहेत. वृक्षतोडी करुन ती जमीन वहितीखाली काढल्या जात आहे. एकीकडे शासन वृक्ष लागवडीचे महत्त्व सांगून त्याचे संगोपन करण्याची माहिती जबाबदारी टाकत असताना दुसरीकडे जंगल तोडीकडे लोक वळत आहे. मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने पर्यावरणाचा र्‍हास होत आहे. त्याचा परिणाम पर्जन्यवृष्टीवर होत असून, पावसाळ्यात पाऊसच नाहीसा झाला आहे. जून, जुलै आणि अर्धा ऑगस्ट महिना संपत आला तरी पाहिजे तसा पाऊस सिंदखेडराजा तालुक्यात कोठेच पडला नाही. मे महिन्यात ज्याप्रमाणे ऊन पडते, अंगाला चटके बसतात, अंगाची लाही लाही होते, त्याप्रमाणे ऑगस्ट महिन्यात चित्र अनुभवयास मिळत आहे. नदी, नाले, तलाव कोरडी पडली आहेत. दररोज निसर्गात होणारा बदल याला कारणीभूत आहे. वृक्षाची होणारी कत्तल वेळीच थांबली नाही तर या भागात वाळवंट झाल्याचे चित्र निर्माण होईल. मेहकर विभागातील वनरक्षकाशी संपर्क साधला असता त्यांनी ज्या भागात अवैध वृक्षतोड झाली असेल किंवा होत असेल त्या भागात तत्काळ कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगीतले.