शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कृऊबा संचालकाविरोधात अवैध सावकारीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 00:18 IST

चिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय माणिकराव गाडेकर याच्याविरुद्ध अवैध सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संजय माणिकराव गाडेकर याच्याविरुद्ध अवैध सावकारी सिद्ध झाल्याने सहायक निबंधक सहकारी संस्था चिखली संदीपकुमार रुद्राक्ष यांनी चिखली पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून गाडेकर याच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे तरतुदी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यासंदर्भात सविस्तर असे, की चिखली येथील सतीश खबुतरे यांनी २४ डिसेंबर २०१४ रोजी जिल्हा निबंधक (सावकारी) तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बुलडाणा यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. सदर तक्रार अर्जाच्या अनुषंगाने उपरोक्त कार्यालयामध्ये प्रकरण चालविल्यानंतर गैरअर्जदार संजय गाडेकर याच्याविरुद्ध २३ आॅगस्ट २०१६ रोजी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १८ (२) अंतर्गत अवैध सावकारी सिद्ध होऊन जमीन परत करण्यासंबंधाने आदेश पारित करण्यात आलेला आहे. सदर आदेशात नमूद केल्यानुसार अर्जदार सतीश खबुतरे यांच्या नावावर असलेली बेराळा ता. चिखली येथील गट क्र.१०४ मधील १.८४ हे.आर क्षेत्रफळापैकी ०.९२ आर शेतजमीन खरेदीखत क्रमांक ४१३१/२००६, दि.८ मे २००६ व गट क्रमांक १०१ मधील ०.३८ आर क्षेत्रफळापैकी ०.१९ आर शेतजमीन खरेदीखत क्र. ४१३२/२००६ दि. १२ जुलै २००६ अन्वये गैरअर्जदार सावकार संजय माणिकराव गाडेकर याच्या नावाने सावकारीच्या ओघात प्रतिभूती म्हणून खरेदीखताद्वारे लिहून दिलेली असल्याने उक्त खरेदीखत हे सावकारी अंतर्गत लिहून दिले असल्याचे सिद्ध झाल्याने ते अवैध असल्याचे घोषित करून रद्द केलेले आहे. गैरअर्जदार गाडेकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे तरतुदी अन्वये गुन्हा नोंद करण्याबाबत पोलीस स्टेशन चिखली या कार्यालयास सूचित करण्यात आलेले आहे. सबब संजय माणिकराव गाडेकर याच्याविरुद्ध महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम ३९ अन्वये वैध अनुज्ञप्तीशिवाय सावकारी व्यवसाय केल्याबाबत गुन्हा नोंद करण्यात यावा, अशा आशयाची तक्रार सहायक निबंधक संदीप रुद्राक्ष यांनी चिखली पोलिसांत दिल्यावरून पोलिसांनी संजय गाडेकर यांच्याविरुद्ध कलम ३९ महाराष्ट्र सावकारी अधिनियम २०१४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एपीआय विक्रांत पाटील करीत आहेत.