शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान पाहिजे, तर आधी पूर्ण पैसे भरा!

By admin | Updated: November 23, 2015 01:13 IST

कृषी साहित्याचे अनुदान थेट लाभार्थ्यांंच्या खात्यात जमा होणार.

नाना हिवराळे / खामगाव : कृषी विभागाच्या वतीने शेतकर्‍यांना देणार्‍या विविध योजनातील साहित्य खरेदीसाठी अनुदान हवे असेल तर आता यापुढे १00 टक्के रकमेचा भरणा करावा लागेल. पुर्ण भरलेल्या रकमेतून अनुदान भेट शेतकर्‍यांच्या खात्यात जमा केले जातील असे आदेश शासनाने ऑगस्ट महिन्यात दिले असुन या संदर्भात २0 नोव्हेंबर पासुन कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. परिणामी ५0 टक्के अनुदानावर साहित्य खरेदी करण्यासाठी दमछाक होणार्‍या शेतकर्‍यांना पूर्ण रकमेचा भरणा कसा करावा असा प्रश्न भेडसावत आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत शेतकर्‍यांना (५0 टक्के किंवा अनुदानाची रक्कम कमी असेल) अनुदानावर कृषी औजाराचे वाटप करण्यात येते. यामध्ये पॉवर टिलर, रोटाव्हेटर, स्वयंचलित भात लागवड यंत्र, ड्रम सीडर, मनुष्यचलीत फवारणी पंप, पावर नॅपसॅक फवारणी पंप, पंप संच, युरिया ब्रिकेट मशीन स्पायरल सेपरेटर, शेततळे, तसेच राष्ट्रीय गळीत धान्य विकास कार्यक्रमा अंतर्गत मनुष्यचलीत औजारे, नॅपसॅक, पावरस्प्रेअर, रोटाव्हेटर, बीबीएफ आदी साहित्याचे वाटप करण्यात येते. साहित्याचे शेतकर्‍यांना थेट वाटप होत असून अनुदानाची रक्कम वगळता उर्वरीत रकमेचा भरणा करावा लागत असे परंतु यापुढे केंद्र शासनाच्या कृषी विभागाच्या शासन निर्णयानुसार राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान २0१५-१६ अंतर्गत औजारे घटकासाठी अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांंच्या खात्यावर जमा करण्याचे निर्देश दिले आहे. यामुळे औजारे वितरणाच्या सध्याच्या प्रचलित पध्दतीमध्ये बदल होणार आहे. शेतकर्‍यांना साहित्य हवे असल्यास कृषी विभागाकडे अर्ज करावा लागतो. लक्षांकानुसार शेतकरी लाभार्थींंची निवड केली जाईल. लाभार्थी निवडीसाठी तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी, कृषी अधिकारी (पं.स.), प्रगतीशिल शेतकरी (१), कृषि अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांची समिती गठीत करण्यात आली आहे. या समिती कडून निवड झालेल्या शेतकर्‍यांना पूर्वसंमती मिळणार आहे. पुर्वसंमती मिळाल्यापासून ४५ दिवसाच्या आत औजाराची खरेदी करणे व अनुदान मिळण्यासाठी कृषी सहाय्यकाकडे प्रस्ताव सादर करण्यापर्यंंत यानंतर तांत्रीक बाबींची रक्कम जमा होईल.