शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
6
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
7
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
8
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
9
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
10
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
11
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
12
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
13
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
14
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
15
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
16
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
17
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वेळपडल्यास शेतकऱ्यांना घरपोच खत, बियाणे - नरेंद्र नाईक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 18:12 IST

जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांच्याशी साधलेला संवाद...

-  ब्रह्मानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्ककोरोना या विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वत्र लॉकडाउन आहे. सध्या हा काळ अत्यंत अडचणीचा असला तरी, खरीप हंगामाची तयारी सुरळीत सुरू आहे. खरीपातील सरासरी पिकांचे नियोजनही पूर्ण झाले आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता सर्व नियमांचे पालन करून पेरणीपूर्व कामे करावी. वेळपडल्यास शेतकºयांना घरपोच खत व बी-बियाणे पोहचविण्यात येतील, याबाबत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी नरेंद्र नाईक यांच्याशी साधलेला संवाद...

लॉकडाउनचा खत, बियाणे पुरवठ्यावर परिणाम होइल का?लॉकडाउनमुळे खत व बियाणे पुरवठ्याबाबत काहीही परिणाम होणार नाही. खत निर्मितीचे सर्व युनिट सध्या सुरू ठेवण्यात आले आहेत. शेतकºयांना पेरणीसाठी आवश्यक असलेले बियाणे उपलब्ध आहे. बियाण्याप्रमाणेच आवश्यक असलेल्या खतांच्या पुरवठ्याबाबतही नियोजन करण्यात आले आहे.

उत्पादन वाढीसाठी काय नियोजन आहे?गटशेतीच्या माध्यमातून उत्पन्नाचे लक्ष गाठू शकतो. गेल्या काही वर्षात ज्या भागात उत्पादन कमी झाले, अशी कमी उत्पादकता असलेली गावे निवडली आहेत. सोयाबीन, कापूस याप्रकारे जो पेरा कमी आहे, याकडेही विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. शेती शाळेच्या माध्यमातून शेतकºयांना मार्गदर्शन करून उत्पादन वाढीच्या अनुषंगाने प्रयत्न करण्यात येतील.

लॉकडाउनमध्ये कृषी विभाग शेतकºयांशी जोडलेला आहे का?खरीपाच्या पेरणीबाबात कुठलीही माहिती शेतकºयांना एसएमएसद्वारे पोहचविण्यात येत आहे. त्यामुळे लॉकडाउनमध्येही कृषी विभाग शेतकºयांशी जोडलेला आहे. गावागावातील कृषी सेवा केंद्रावरून त्यांच्या संपर्कातील ग्राहकांना व त्या गावातील सर्वच शेतकºयांना खत, बियाण्याची घरपोच सेवा देता येईल.

पिकांचे नियोजन कसे आहे?जिल्ह्यात खरीप हंगामातील पिकांचे नियोजन ७ लाख ३८ हजार हेक्टर क्षेत्रावर करण्यात आले आहे. सोयाबीन पिकाचे नियोजन ३ लाख ७१ हजार हेक्टर, कापूस २ लाख १० हजार हेक्टर, मका २६ हजार हेक्टर, तूर ७८ हजार हेक्टर, मूग २० हजार हेक्टर, उडीद ३१ हजार ४०० हेक्टर व उर्वरीत क्षेत्रावर इतर पेरा राहणार आहे.

महाबिजचे नियोजन काय आहे?महाबिजकडून बियाणे देण्याचे नियोजन पूर्ण झाले आहे. सोयाबीनचे २४ हजार क्विंटल बियाण्याचा पुरवठा महाबिजकडून होत आहे.शेतकºयांना घरपोच सेवा देण्याची वेळ आल्यास तसे नियोजन करण्यात आले आहे. गावागावातील कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून खत, बियाणे पुरवठ्याबाबत अंमलबजावणी करता येईल. शेतकºयांना खरीप हंगामातील पेरणीसाठी कुठलीही अडचण येणार नाही.

टॅग्स :buldhanaबुलडाणाagricultureशेतीinterviewमुलाखत