शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांच्या मागण्या मान न झाल्यास साखळी उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2017 20:20 IST

डोणगाव (बुलडाणा): कर्जमाफीसह शेतकºयांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ दिवाळीपूर्वी मिळाला नाही तर साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा लोणी गवळी येथील शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाव्दारे दिला आहे. 

ठळक मुद्देलोणी गवळी येथील शेतक-यांचे जिल्हाधिका-यांना निवेदनयोजनांचा लाभ दिवाळीपूर्वी मिळाला नाही तर साखळी उपोषण 

लोकमत न्यूज नेटवर्कडोणगाव (बुलडाणा): कर्जमाफीसह शेतकºयांच्यासाठी असलेल्या विविध योजनांचा लाभ दिवाळीपूर्वी मिळाला नाही तर साखळी उपोषण करणार असल्याचा इशारा लोणी गवळी येथील शेतकºयांनी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाव्दारे दिला आहे. मेहकर तालुक्यातील शेतकरी, शेतमजूर यांना महाराष्ट्र राज्य सरकार यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेची तत्काळ अंमलबजावणी करुन  दिवाळीपूर्वी रक्कम शेतकºयांच्या खात्यात जमा करावी. तसेच सन २०१६ नंतर कर्जभरणा करणाºयांना सदर कर्जमाफी योजनेमध्ये समाविष्ट करुन सरसगट कर्जमाफी द्यावी. एकाच कुटूंबातील एकाच व्यक्तीला कर्जमाफीचा लाभ मिळेल ही अट रद्द करुन ज्याच्या नावे सातबारा व कृषी कर्ज आहे, अशा सर्व कुटूंब सदस्य शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ द्यावा, शेतकºयांना आधारकार्डाची सक्ती न करता कर्जामाफीचा लाभ देण्यात यावा, तसेच शेतकरी पिक योजनेमध्ये नुकसानधारक शेतकºयांनी नुकसान झाल्याझाल्या ४८ तासात नुकसानीचा पंचनामा करुन अहवाल पाठविण्याची अन्यायकारक अट तत्काळ रद्द करावी, आदी मागण्या शेतकºयांनी केल्या आहेत. या मागण्या पूर्ण न झाल्यास उपविभागीय अधिकारी मेहकर यांचे कार्यालयासमोर परिसरातील शेतकºयांसह ९ आॅक्टोबरपासून साखळी उपोषणास बसणार असल्याचे निवेदन लोणी गवळी येथील शेतकरी प्रशांत पाटील व संतोष भांबे यांनी जिल्हाधिकारी यांना दिले आहे.