शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

सतत उच्च ध्येयाचा विचार हाच यशाचा मार्ग:  संतोष तोत्रे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2019 14:10 IST

सतत मोठे विचार करणे व उच्च ध्येय मनात घोळविणे, हाच खरा यशाचा मार्ग आहे, असे मार्गदर्शन मौलिक विचार सदगुरू  वामनराव पै यांचे सतशिष्य व प्रबोधनकार संतोष तोत्रे यांनी येथे केले.

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: पुन्हा पुन्हा घोळवलेले विचार अंतर्मनात जातात व जीवनात साकार होतात. माणसाच्या अंतर्मनात प्रचंड ईश्वरीशक्ती वास करते. म्हणून तिला अशक्य असे काहीही नाही. जसा तुमचा विचार तसा जीवनाला आकार. सतत मोठे विचार करणे व उच्च ध्येय मनात घोळविणे, हाच खरा यशाचा मार्ग आहे, असे मार्गदर्शन मौलिक विचार सदगुरू  वामनराव पै यांचे सतशिष्य व प्रबोधनकार संतोष तोत्रे यांनी येथे केले.मोताळा येथील सहकार विद्या मंदीर, मराठी प्राथमिक शाळा (शेलापूर) व स्व. बबनराव देशपांडे विद्यालय या शाळांतील विद्यार्थ्यांना जीवनविद्या विद्यार्थी  मार्गदर्शन अभियानात ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, आपल्या जीवनाचे शिल्पकार आपणच आहोत. आपले जीवन बुवा- बाबा, भगत- फकीर, गंडे- दोरे, उदी- भस्म घडवत नाही. सटवी पाचवीच्या दिवशी आपल्या कपाळावर  आपले नशीब लिहीत नसून आपण घडवू तसे आपले नशीब घडते. जन्माला आल्यापासून मरेपर्यंत माणूस शिकत असतो म्हणून क्षणाक्षणाला शिकले म्हणजे  शिक्षण होय. अभ्यासाला सर्व काही शक्य आहे. अभ्यासाचा कंटाळा म्हणजे भाग्याला टाळा असा संदेश त्यांनी दिला. साधी सोपी अभ्यासाची पध्दतही त्यांनी विद्यार्थ्यांना शिकविली, असे ते म्हणाले.माता, पिता, शिक्षक, सदगुरू व आत्मदेव हे खºया अर्थाने चालते बोलते पाच देव आहेत. हसत - खेळत झालेले हे व्याख्यान विद्यार्थ्यांना अत्यंत प्रेरणादायी ठरले व विद्यार्थी तर अक्षरश: मंत्रमुग्ध होऊन समरस झाले होते. ऐकताना त्यांना वेळेचेही भान नव्हते. हे पाहून शिक्षकवृंद सुध्दा अचंबित झाले होते. पुन्हा पुन्हा या व्याख्यानांचे आयोजन करण्यात यावे अशी विनंती केली व या अभियानाचे कौतुक सुध्दा केले. या प्रसंगी मुख्याध्यापक अभिजित देशमुख , पर्यवेक्षक राजपूत  , सुनिल बराटे , जीवनविद्या मिशनचे पुरूषोत्तम टेकाडे , संदिप तायडे, दोन्ही शाळांचे शिक्षकवृंद व जीवनविद्या मिशनचे असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाkhamgaonखामगावspiritualअध्यात्मिक