शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाऱ्यांना धडा शिकवीन - सावजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 01:12 IST

शेगाव : पाणीपुरवठ्याच्या विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्यांना धडा शिकवीन, असे रोखठोक प्रतिपादन माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केले.

शेगाव : बुलडाणा जिल्ह्यातील १४२० गावांमध्ये पाणीपुरवठ्याच्या विविध योजनांमध्ये भ्रष्टाचार झाला असून, भ्रष्टाचाऱ्यांवर अपहार रकमेच्या वसुलीची कार्यवाही करावी, अन्यथा भ्रष्टाचाराला पाठीशी घालणाऱ्यांना धडा शिकवीन, असे रोखठोक प्रतिपादन माजी मंत्री सुबोध सावजी यांनी केले. स्थानिक विश्रामगृहावर आयोजित पत्रपरिषदेत सावजी यांनी सांगितले की, बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणी पुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समिती स्थापन केली असून, त्या माध्यमातून आंदोलने केली जातील, असे भ्रष्टाचाराचे विविध दाखले देत केलेले प्रतिज्ञापत्र त्यांनी दाखवून बुलडाणा जिल्हा शासकीय नळपाणीपुरवठा भ्रष्टाचार निर्मूलन समितीची स्थापना केल्याची माहिती दिली. बुलडाणा जिल्हा शासकीय नळ पाणीपुरवठा निर्मूलन समितीमार्फत कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जि.प. बुलडाणा, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण बुलडाणा यांना १३ मुद्यांचे १४२० गावातील पाणी पुरवठा योजनेच्या विविध समस्यांचे निवेदन देऊन त्यावर १५ आॅगस्टपर्यंत झालेला भ्रष्टाचार उघड न झाल्यास १५ आॅगस्ट ते २२ आॅगस्ट दरम्यान ब्रँडेड कंपनीच्या पण जुन्या व फाटक्या चपला व जोडे पाणीपुरवठा कार्यकारी अभियंता जि.प. बुलडाणा, कार्यकारी अभियंता जीवन प्राधिकरण बुलडाणा यांना देण्यात येतील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. माजी मंत्री सुबोध सावजी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीत उपाध्यक्ष वा.रा.पिसे, प्रमोद पाटील चिखली, अंबादास पाटील खामगाव, सचिव अमित जाधव शेगाव, सदस्यपदी सुनिता भांड लोणार, सुनिल कोल्हे मोताळा, संजय तारापुरे शेगाव, गणेश जुनघरे, रमेश घोलप, रवि पाटील, गणेशराजे जाधव आदींचा समावेश आहे.या समितीच्या माध्यमातूनच पाणी पुरवठयाच्या योजनांबाबत लढा देण्यात येईल असेही त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले. यावेळी शैलेष सावजी, देवलाल पाटील, लक्ष्मण दांदळे, संतोष टाकळकर, लताबाई घाईत, गजेंद्र धनोकार, प्रकाश भोजने, रहीमखा शे अमीन आदींची उपस्थिती होती.