शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

हमालांच्या संपामुळे तुरीची हर्रासी दिवसभर बंद!

By admin | Updated: April 18, 2017 01:01 IST

शेतकऱ्यांचा रास्ता रोको, कार्यालयाच्या काचा फोडल्या

नांदुरा : हमालांनी रात्री व्यापाऱ्यांची तूर एफसीआयच्या पोत्यात भरताना सहा दिवसांपूर्वी शेतकऱ्यांनी पकडल्यानंतर बाजार समितीने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून काही हमालांची पोलिसांनी चौकशी केली त्याचा प्रतीकार करण्यासाठी हमालांनी अचानक सोमवारी सकाळीच एफसीआय व नियमित हर्रासी बंद पाडली. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले व त्यांनी दुपारी चार वाजेदरम्यान नांदुरा-बुलडाणा रोडवर बाजार समितीसमोर बसून आंदोलन केल्याने रस्ता बंद झाला तर काही अज्ञातांनी कार्यालयातील काचा फोडल्या. अखेर पोलिसांनी कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने संध्याकाळी शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात एफसीआयची तूर खरेदी सुरू असून, मागील महिन्यातील २० मार्चला आलेल्या मालाची मोजणी सुरू आहे. आधीच या खरेदीत गैरव्यवहार व शेतकऱ्यांना डावलून व्यापाऱ्यांच्या मालाची खरेदी होत असल्याचे शेतकऱ्यांनी सिद्ध केल्यानंतरही ११ एप्रिलच्या रात्री काही हमालांना व्यापाऱ्यांचा माल भरताना रंगेहात शेतकऱ्यांनी पकडले. त्यावरील तक्रारीवरून काही हमालांची पोलिसांनी चौकशी केली. आता हमाल संघटनेने यापूर्वीही १३ एप्रिलला आंदोलन करून हर्रासी व शासकीय खरेदी बंद पाडली होती. १७ एप्रिलला हमाल संघटनेने तहसीलदार, पोलीस स्टेशन, सहायक निबंधक आदींना निवेदन देऊन त्यांनी पोलीस चौकशीत ज्यांची नावे सांगितली त्यांच्याविरुद्ध कारवाई करावी, असे निवेदन देऊन मोजणी केलीच नाही. त्यामुळे हर्रासी व शासकीय तूर खरेदी बंद पडली. मागील चाळीस दिवसांपासून बाजार समितीत तूर विक्रीसाठी प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांचा या सर्व प्रकारामुळे संताप अनावर झाला, त्यांनी बाजार समिती अधिकारी व पदाधिकारी यांना धारेवर धरले. तुरीची आजही मोजणी होणार नाही, यामुळे संतप्त झालेले सर्व शेतकरी नांदुरा-बुलडाणा रोडवर जावून बसले, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तासाभरासाठी ठप्प झाली होती. काही अज्ञातांनी बाजार समितीच्या कार्यालयातील खिडकीच्या काचा फोडल्या व खुर्च्या फेकल्या. नांदुरा पोलिसांनी यावेळी संतप्त शेतकऱ्यांना २४ तासात सर्व चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवडला; मात्र चाळीस दिवसांपासून पडून असलेली तुरीची मोजणी केव्हा होणार व एफसीआयच्या खरेदीतील सावळा गोंधळ व गैरव्यवहार दाबण्याचा प्रशासन का प्रयत्न करीत आहे. शेतकऱ्यांच्या नावावर व्यापाऱ्यांचा माल विकणाऱ्यांना प्रशासन का पाठीशी घालत आहेत व हे प्रकरण दाबण्याचा कोण प्रयत्न करीत आहे, याबाबत शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष आहे, तर ग्रेडर खर्चे यांना का अभय दिल्या जाते, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांचा आहे. तुरीच्या खरेदीतील हेराफेरी व गैरव्यवहार करणाऱ्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी शेतकरी व हमाल संघटनेची आहे. शेतकऱ्यांना नाहक हेलपाटेएफसीआयला तूर विक्री करणारे शेतकरी मागील चाळीस दिवसांपासून बाजार समितीत ठाण मांडून आहेत. त्यांच्या डोळ्यासमोर एफसीआयच्या तूर खरेदीतील गौडबंगाल, गैरव्यवहार व हेराफेरी पाहून ते संतप्त झाले आहेत. रात्रीच्या अंधारातील व्यापाऱ्यांची तूर खरेदीचा त्यांनी पर्दाफाश केला. त्याबाबत पोलीस स्टेशनला तक्रार झाली; मात्र कारवाई झाली नाही. आता हमालांनीही निवेदन देऊन कारवाईची मागणी करून हर्रासी व शासकीय खरेदी बंद पाडली.