शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

बँकेच्या विरोधातील उपोषण पाचव्या दिवशीही सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:40 IST

देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा येथील ज्ञानेश्वर म्हस्के यांनी २०१८ मध्ये आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडे १० लाखांचा कर्जपुरवठा करण्यासाठी अर्ज केला ...

देऊळगावराजा तालुक्यातील अंढेरा येथील ज्ञानेश्वर म्हस्के यांनी २०१८ मध्ये आण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाकडे १० लाखांचा कर्जपुरवठा करण्यासाठी अर्ज केला होता. महामंडळाकडून त्यांचा अर्ज पात्र ठरवण्यात आला होता. स्टेट बँक ऑफ इंडिया देऊळगावमही शाखेकडून कर्ज प्रकरण दाखल करून घेतल्याने व मंजुरीसाठी बुलडाणा येथे पाठवले असता, सर्व कागदपत्रांची पूर्तता करा तुमचे कर्ज प्रकरण मंजूर करतो, असे आश्वासन शाखा व्यवस्थापक व अधिकाऱ्यांनी दिले. दरम्यान, ज्ञानेश्वर म्हस्के यांनी बँकेच्या खात्यामधून अपेक्षित व्यवहार केला असता त्यानंतरही कोणतेही गहाणखत लागत नसतानाही तीन वर्षांपासून कर्ज नाकारले जात असल्याने म्हस्के यांनी उपोषणाचा मार्ग अवलंबला. १५ ऑगस्टपासून ज्ञानेश्वर म्हस्के यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरूच आहे.

बँक अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ

देऊळगावमही स्टेट बँक शाखा व्यवस्थापक चित्राल यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. स्टेट बँक बुलडाणा अधिकारी अमर कुलकर्णी यांनी लोन केससाठी स्टॅम्प ड्युटी भरण्यास सांगितली होती. त्यांनी आज फोन घेण्यास टाळले तर दीपक नांदेश्वर यांनी प्रकरण स्थानिक शाखेकडे पाठवून दिले असल्याची माहिती दिली.