शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

दीड हजारांवर तणावग्रस्त शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:09 IST

मेहकर :  तालुक्यात जवळपास १७३0 तणावग्रस्त शेतकरी आहेत. या शेतकर्‍यांना तणावग्रस्त असल्याचे कार्डसुद्धा वाटप करण्यात आले आहे. मात्र, तणावग्रस्त शेतकर्‍यांना तणावमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नसून, शासनाच्या मदतीपासूनही हे शेतकरी वंचित आहेत. तणावग्रस्त शेतकर्‍यांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने तणावग्रस्त शेतकरी तणावातच वावरत आहेत.

ठळक मुद्देतणावग्रस्त शेतकर्‍यांची केवळ नोंदच तणावग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कमेहकर :  तालुक्यात जवळपास १७३0 तणावग्रस्त शेतकरी आहेत. या शेतकर्‍यांना तणावग्रस्त असल्याचे कार्डसुद्धा वाटप करण्यात आले आहे. मात्र, तणावग्रस्त शेतकर्‍यांना तणावमुक्त करण्यासाठी प्रशासनाकडून कोणतेही प्रयत्न होत नसून, शासनाच्या मदतीपासूनही हे शेतकरी वंचित आहेत. तणावग्रस्त शेतकर्‍यांकडे शासनाचे दुर्लक्ष असल्याने तणावग्रस्त शेतकरी तणावातच वावरत आहेत.गेल्या दोन-तीन वर्षांपासून मेहकर तालुक्यावर दुष्काळाचे सावट आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण कमी जास्त होत आहे. शेतकरी बँकांकडून, तर कधी सावकारांकडून कर्ज घेऊन बी-बियाणे खरेदी करून पेरणी करतात. पिकांच्या भरवशावर शेतकर्‍यांचे संपूर्ण वर्षभराचे आर्थिक नियोजन ठरलेले असते. मात्र, कमी पाऊस, तर कधी अतवृष्टी यामुळे पिकांचे नुकसान होऊन पाहिजे त्या प्रमाणात पिकांचे उत्पादन होत नाही. कसे-बसे आलेल्या पिकांना बाजारात भाव नाही, त्यामुळे बँकेचे कर्ज, सावकाराचे कर्ज, कसे फेडावे, मुलीचे लग्न कसे करावे, वर्षभर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवावा, या चिंतेत शेतकरी बांधव असतात. आर्थिक नियोजन बिघडल्याने शेतकरी तणावात वावरतात. अनेक शेतकरी हतबल होऊन आत्महत्येकडे वळतात. त्यामुळे तणावग्रस्त शेतकर्‍यांचा शोध घेऊन, त्यांना तणावमुक्त करण्यासाठी शासनाकडून उपाययोजना सुरू होत्या. त्यानुसार मेहकर तालुक्यात जवळपास १७३0 तणावग्रस्त शेतकरी आढळून आले आहेत. यामध्ये अंजनी बु. मंडळातून १८६ शेतकरी, मेहकर मंडळातून १७७, डोणगाव मंडळातून ११८, लोणी गवळी मंडळातून १00, शेलगाव देशमुख मंडळातून १२४, वरवंड मंडळातून १६७, जानेफळ मंडळातून २00, नायगाव दत्तापूर मंडळातून २३२, देऊळगाव माळी मंडळातून २२१, तर हिवरा आश्रम मंडळातून २0५  शेतकरी याप्रमाणे १७३0 तणावग्रस्त शेतकरी आढळून आले. या शेतकर्‍यांना तणावग्रस्त असल्याचे कार्डसुद्धा वाटप करण्यात आले आहे. मात्र, या तणावग्रस्त शेतकर्‍यांना तणावमुक्त करण्यासाठी संबंधित विभागाकडून कोणतीही जनजागृती करण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. तसेच तणावग्रस्त शेतकर्‍यांना शासनाकडूनही अद्याप मदत देण्यात आली नाही. त्यामुळे हे तणावग्रस्त शेतकरी आजरोजीसुद्धा तणावातच वावरत असल्याचे चित्र दिसून येत आहे.     

तणावग्रस्तांसाठी सात महिन्यापूर्वी झाली होती सभामेहकर तालुक्यातील तणावग्रस्त शेतकर्‍यांना मार्गदर्शन करुन त्यांना वेळोवेळी मदत करण्याच्या उद्देशाने तत्कालीन जिल्हाधिकारी विजय झाडे यांनी स्थानिक गजानन महाराज मंदिरावर जानेवारी महिन्यात सभा घेतली होती. परंतु त्यानंतर गेल्या सात महिन्यांपासून या तणावग्रस्तांसाठी एकही सभा अथवा बैठक झाली नसल्याचे अनेक शेतकर्‍यांनी सांगितले.

मेहकर तालुक्यातील तणावग्रस्त शेतकर्‍यांच्या प्रश्नावर तहसीलदारांशी चर्चागेल्या काही वर्षांमध्ये पावसाचे प्रमाण कमी अधिक होत असल्याने पिकांच्या उत्पादनात कमालीची घट झाली आहे. पिकांना भाव नाही, कर्जाचा बोजा डोक्यावर असल्याने शेतकरी चिंताग्रस्त अवस्थेत आहेत. शेतकर्‍यांवर दरवर्षी अस्मानी संकट कोसळत असल्याने अनेक शेतकरी तणावातच वावरत आहेत. त्यामुळे तणावग्रस्त शेतकर्‍यांचा सर्व्हे करून, त्यांना तणावमुक्त करण्याच्या सूचना शासनाकडून देण्यात आल्या होत्या. परंतु, मेहकर तालुक्यातील बहुतांश तणावग्रस्त शेतकरी हे तणावातच वावरत आहेत. महसूल विभागाकडून तणावग्रस्तांसाठी जनजागृतीसंदर्भात उदासीनता दिसून येत आहे. यासंदर्भात मधुकरराव गवई यांनी मेहकर येथील तहसीलदार संतोष काकडे यांच्याशी ९ ऑगस्ट रोजी तणावग्रस्त शेतकर्‍यांसंदर्भात चर्चा केली.