शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

नृसिंह जन्मोत्सवाला शेकडो वर्षांंची परंपरा !

By admin | Updated: May 9, 2017 02:38 IST

आज नृसिंह जयंती : मेहकरच्या मूर्तीचा स्कंद पुराणात उल्लेख !

ब्रम्हानंद जाधवबुलडाणा : भगवान विष्णूने घेतलेल्या दहा अवतारांपैकी नृसिंह हा चवथा अवतार समजला जातो. राज्यभर नृसिंह मंदिर बोटावर मोजण्याइतकी आहेत; बुलडाणा जिल्ह्यात चार नृसिंह मंदिरे असून शेकडो वर्षापासून या मंदिरांमध्ये जन्मोत्सवाची परंपरा जपली जाते. बुलडाणा जिल्ह्यात चांडोळ, जानोरी, उमरद व मेहकर येथे ही नृसिंह मंदिरे आहेत. मेहकर येथील प्राचीन नृसिंहमुर्तीचा उल्लेख स्कंद पुराणात व गीता महात्म्यात आहे. मेहकरच्या नृसिंह मंदिरातील नवरात्रोत्सवाचे हे ४३६ वे वर्ष आहे. पितळे घराण्याच्या मूळपुरुषाला येथील माळीपेठेतील एका भुयारात ही प्राचीन नृसिंह मूर्ती मिळाली होती. तेव्हापासून सलग बारा पिढय़ांद्वारे पितळे घराण्यात नृसिंहाची उपासना सुरु आहे. प्राचीन नृसिंह मंदिरामध्ये नवरात्रोत्सव दरवर्षी विशिष्ट पारंपारिक पद्धतीने साजरा होतो. उत्सवामध्ये भजन-पूजन आदी उपक्रम साजरे होतात. नृसिंह मंदिरामध्ये मुख्य आकर्षण असते नृसिंह जयंतीच्या दिवशी श्रीमूर्तीला केल्या जाणार्‍या पोषाखाचे! हा पोषाख देणार्‍याला गुह्य पद्धतीची पारंपरिक साधना व विशिष्ट अनुष्ठान करावे लागते. अनेक वर्षापासून ही धुरा संत बाळाभाऊ महाराजांच्या गुरुपीठाचे उत्तराधिकारी अँड. रंगनाथ महाराज पितळे हे सांभाळत आहेत. नृसिंहाच्या उग्ररुपाचे घडते दर्शन ! नृसिंहजन्मावेळी मेहकर शहरातील प्राचीन नृसिंह मंदिरामध्ये नाट्यमयरित्या पडदा उघडून सजविलेल्या नृसिंहाच्या उग्ररुपाचे दर्शन घडते, तेव्हा भाविकांची दर्शनासाठी झुंबड उडते.