खामगाव : येथील भगतसिंग चौकमधील प्रेम रेसीडेन्सी परिसरात दोन गटात वाद होऊन झालेल्या हाणामारीमध्ये रवी शमी (३५) हा युवक गंभीर जखमी झाला. ही घटना गुरुवारी रात्री १२.३0 वाजताच्या दरम्यान घडली. जखमी रवी शमीला पोलीसांनी सामान्य रुग्णालयात दाखल केले असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. टोळी युद्धातून हा प्रकार घडल्याचे समजते.
खामगावात हाणामारी; एक गंभीर जखमी
By admin | Updated: May 20, 2016 01:57 IST